बहिणीशी केलेल्या 'लव्ह मॅरेज'मुळे वैतागला मेहुणा, 10 वर्षांनंतर दाजीवर गोळीबार; कोल्हापूर हादरले
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : दहा वर्षांपूर्वी बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या दाजीवर मेहुण्याने गोळीबार केला. या घटनेत दाजीच्या मांडीला उजव्या मांडीला गोळी लागली, त्यात ते...
Kolhapur News : दहा वर्षांपूर्वी बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या दाजीवर मेहुण्याने गोळीबार केला. या घटनेत दाजीच्या मांडीला उजव्या मांडीला गोळी लागली, त्यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर मेहुण्याने पिस्तुल साफ करत असताना चुकून गोळी झाडली गेली, असा बनाव रचला. पण, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर बहिणीशी प्रेमविवाह केल्याचा रागातून जाणीवपूर्वक हल्ला केला असल्याचा गुन्हा कबूल केला. ही धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील नावली येथे घडली.
...अशी घडली धक्कादायक घटना
या घटनेतील आरोपी नीलेश राजाराम मोहिते (वय-45) असे नाव आहे. हा माजी सैनिक आहे. अशोक पाटील (वय-40) हे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, सोमवारी सकाळी दाजी अशोक पाटील आणि मेहुणा मोहिते यांच्या जोरदार वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या मेहुण्याने 2 गोळ्या दाजीच्या दिशेने झाडल्या. त्यात एक होळी दाजीच्या उजव्या मांडीला लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने यशवंत आयुर्वेदिक दवाखान्यात दाखल करण्यात आले.
advertisement
पोलिसांनी असा केला खुलासा
या धक्कादायक घटनेनंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. पहिल्यांदा मोहिते याने पिस्लूलची साफसफाई करताना चुकून गोळी लागली, असा बनाव रचला. त्यामुळे घटनास्थळी पोहोचलेले पोलिसही संभ्रमावस्थेत होते. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवीद्र करमळकर यांनी कसून चौकशी केल्यानंतर मेहुणा विनोद पाटील यांनी कबूल केले की, 10 वर्षांपूर्वी बहिणीशी केलेल्या लव्ह मॅरेजमुळे हा गोळीबार केला.
advertisement
हे ही वाचा : आई झोपताच साधला डाव, नराधमाने चिमुकलीला रेल्वे स्थानकावरून उचललं अन्.., बीडला हादरवणारी घटना
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बहिणीशी केलेल्या 'लव्ह मॅरेज'मुळे वैतागला मेहुणा, 10 वर्षांनंतर दाजीवर गोळीबार; कोल्हापूर हादरले