मामाने टीप दिली अन् भाच्याने केला कांड, मालकासोबत घडला विचित्र प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शिवारात एक विचित्र घटना घडली आहे. इथं एका तरुणाने मामाच्या सांगण्यावरून मोठा कांड केला.
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शिवारात एक विचित्र घटना घडली आहे. इथं एका तरुणाने मामाच्या सांगण्यावरून मोठा कांड केला. मामाने टीप दिल्यानंतर भाच्यानं आपल्या एका मित्रासमवेत एका ज्येष्ठ व्यक्तीला लुटलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत घटनेचा छडा लावला असून तिघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी लुटलेली रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास नर्सी नामदेव पोलीस करत आहेत.
मामा रामा राऊत, भाचा राजेश पवार आणि त्याचा मित्र प्रतीक शेळके असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर प्रभाकर देशमुख असं लूट झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामा राऊत हा प्रभाकर देशमुख यांच्याकडे चालक म्हणून काम करतो. घटनेच्या दिवशी बुधवारी, ४ जून रोजी दुपारी हिंगोली येथील प्रभाकर देशमुख हे त्यांचा चालक रामा राऊत याच्यासोबत दुचाकीवरून सेनगाव येथून हिंगोलीकडे जात होते.
advertisement
दरम्यान, ब्रह्मपुरी पाटीजवळ दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. आरोपींनी देशमुख यांना धमकी देत त्यांच्या हातातील दोन लाख रुपये असलेली बॅग आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी चालक रामा राऊत याचा शोध घेऊन त्याची चौकशी केली. पोलिसांच्या प्रश्नांच्या भडीमारामुळे रामा गडबडला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपला भाचा राजेश पवार याला प्रभाकर देशमुख यांच्याकडे पैसे असल्याची टीप दिली होती.
advertisement
रामाच्या कबुली जबाबानुसार, राजेश पवार आणि त्याचा मित्र प्रतीक शेळके यांनी ही लूट केल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ राजेश पवार आणि प्रतीक शेळके यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मामा, भाचा आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
June 08, 2025 10:42 AM IST