पतीचं सैतानी कृत्य, पत्नीचे स्तन कापले, प्रायव्हेट पार्टवरही वार, देशाला हादरवणारी घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं नाक आणि स्तन कापले. तसेच त्याने पत्नीच्या गुप्तांगावर देखील चाकूने वार केले आहेत.
Crime News: एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्याने आपल्या पत्नीचं नाक आणि स्तन कापले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पत्नीच्या गुप्तांगावर देखील चाकूने वार केले आहेत. पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
कमल वर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर सावित्रीबाई असं पीडित महिलेचं नाव आहे. आरोपी कमल वर्मा हा सारंगपूरच्या लिमा चौहान पोलीस स्टेशन परिसरातील पडल्या माताजी गावात पत्नीसोबत राहतो. त्याने मंगळवारी ३५ वर्षीय सावित्रीबाई यांच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केलं. आरोपीनं महिलेच्या एका स्तनाचा ५० टक्क्यांहून अधिक भाग कापला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कमलला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं समजत आहे.
advertisement
हल्ल्यात महिला गंभीर जखमी
पतीने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी पती पळून गेला. लिमा चौहान पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजता मध्यप्रदेशातील सारंगपूर इथं घडली आहे. जखमी महिलेने सांगितले की, तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतो. तिचं दुसऱ्या कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत, असा संशय पतीला होता.
advertisement
दोघांमध्ये वारंवार व्हायचं भांडण
चारित्र्याच्या संशयातून दोघांमध्ये दररोज वाद होत असे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पती कमल वर्मा याने ३५ वर्षीय सावित्राबाई यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि तिचे नाक, कान आणि स्तन कापले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पत्नीच्या गुप्तांगांवरही चाकूने वार केले. महिलेला गंभीर अवस्थेत सारंगपूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टर मनीष सूर्यवंशी यांनी महिलेवर प्राथमिक उपचार केले आणि तिला शाजापूर येथे रेफर केले. तिथे महिलेवर उपचार सुरू आहेत. हे कृत्य केल्यापासून आरोपी पती फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Location :
Madhya Pradesh
First Published :
June 04, 2025 1:00 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पतीचं सैतानी कृत्य, पत्नीचे स्तन कापले, प्रायव्हेट पार्टवरही वार, देशाला हादरवणारी घटना