नवरा नव्हे, 'हा' तर हैवान! बायकोला क्रूरपणे संपवलं, तुकडे केले, काही माशांना खाऊ घातले अन् काही...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
श्रावस्ती जिल्ह्यातील जबडी गावात सैफुद्दीन याने पत्नी मकीन ऊर्फ सबीना हिचा निर्घृण खून केला. हुंड्यासाठी होत असलेल्या त्रासातून सुटका म्हणून त्याने सबिनाचा खून करून शरीराचे तुकडे केले. काही भाग...
उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. इथे एका निर्दयी नवऱ्यानं आपल्या पत्नीला अत्यंत क्रूरपणे मारलं. सैफुद्दीन असं या राक्षसी नवऱ्याचं नाव आहे. त्याने पत्नी मुकीन ऊर्फ सबीना हिचे पहिले तुकडे तुकडे केले, इतकंच नव्हे तर काही तुकडे कालव्यातल्या माशांना खायला घातले आणि उरलेले तुकडे जाळून टाकले.
हुंड्यासाठी देत होता त्रास
सबीनाचा भाऊ सलाहुद्दीन याने सांगितलं की, त्याची बहीण सबीनाला लग्नानंतर हुंड्यासाठी खूप त्रास दिला जात होता. सैफुद्दीन हा श्रावस्ती जिल्ह्यातील हरदत्तनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबडी गावात राहतो. तो त्याची पत्नी मुकीन हिला लखनऊला घेऊन जातो, असं सांगून घरातून निघाला होता. पण वाटेत त्याने तिला मारून तिचे तुकडे केले आणि नंतर तिला जाळून टाकलं.
advertisement
बहीण बेपत्ता होण्याची भावाने दिली तक्रार
जेव्हा भाऊ सलाहुद्दीनने त्याच्या बहिणीला फोन केला, तेव्हा तिचा फोन बंद येत होता. त्यामुळे तो तिच्या घरी गेला. तिथे त्याला समजलं की, तिचा नवरा तिला घेऊन लखनऊला गेला आहे. पण संध्याकाळी तिचा नवरा गावातच फिरताना दिसला. यामुळे कुटुंबीयांना संशय आला आणि सलाहुद्दीनने मंगळवारी पोलीस ठाण्यात त्याच्या बहिणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.
advertisement
जळालेला हात सापडला अन् कृत्य उघड झालं.
पोलिसांनी जेव्हा महिलेचा शोध सुरू केला, तेव्हा त्यांना तिचा नवरा सैफुद्दीन भेटला. सैफुद्दीनने दोन दिवस पोलिसांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. ज्या ठिकाणी त्याने हे कृत्य केलं होतं, त्या बागेत सबीनाचा जळालेला हात पोलिसांना सापडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सैफुद्दीनला अटक करून तुरुंगात पाठवलं आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
पोलीस करत आहेत कारवाई
दरम्यान, पोलीस अधीक्षक घनश्याम चौरसिया यांनी सांगितलं की, पत्नीची हत्या करणारा सैफुद्दीन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने पत्नीचे तुकडे करून तिला जाळलं, ज्याचे काही जळालेले अवशेष घटनास्थळी सापडले आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.
advertisement
हे ही वाचा : "हा घे नंबर अन् रात्री काॅल कर", प्राध्यापकाचा मोठा कांड, एक नव्हे, तर तब्बल 12 विद्यार्थिनींचा...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 12:48 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
नवरा नव्हे, 'हा' तर हैवान! बायकोला क्रूरपणे संपवलं, तुकडे केले, काही माशांना खाऊ घातले अन् काही...