'मोजून देतो बाबा...' तरुणाने भोळ्या शेतकऱ्याचे पैसे मोजून देता देता घातले खिशात, VIDEO

Last Updated:

बाबा द्या मी मोजून देतो.तरुणाचे हे शब्द ऐकून एक क्षण गोंधळलेल्या शेतकऱ्याला धीर आला, पण नंतर घडलं भयंकर

News18
News18
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव : भोळ्या आणि गरीब शेतकऱ्याने तरुणावर विश्वास ठेवला आणि तेच त्याला महागात पडलं आहे. बँकेतून भोळ्या शेतकऱ्याला हातोहात फसवून चालाखीने तरुण पसार झाला आहे. शेतकऱ्याला हे समजेपर्यंत खूप उशीर झाला आणि डोळ्यात पाणी पश्चाताप करण्याची वेळ आली. हा संपूर्ण प्रकार इतका भयंकर आहे की माणुसकीवरचा विश्वास उडावा असा प्रकार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बँकेत गेला होता. त्याने बँकेतून पैसे काढले आणि ते मोजत होता. त्याला आकडे काही लागेना. त्यामुळे तो पुन्हा मोजत होता. शेतकऱ्याची ही अवस्था पाहून त्याचा फायदा तरुणाने उचलला. हा तरुण शेतकऱ्याजवळ आला आणि म्हणाला बाबा द्या मी मोजून देतो. त्याचे हे शब्द ऐकून एक क्षण गोंधळलेल्या शेतकऱ्याला धीर आला.
advertisement
त्या शेतकऱ्याला काय माहिती की या गोड शब्दांमध्ये किती मोठा चोर दडला आहे ते. त्याने अगदी भोळेपणाने आपल्या हातातले पैसे त्याला मोजायला दिले. त्याच चोराने अगदी हातचालाखीने शेतकऱ्याचे पैसे लाटले आणि पँटच्या खिशात भरुन तो बँकेतून पसार झाला. याचा संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
ही धक्कादायक घटना जळगावच्या सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत वयोवृद्ध शेतकऱ्याने काढलेले पैसे मोजत असताना बँकेत एका तरुणाने मी पैसे मोजून देतो बाबा असे म्हणत त्याने हात चलातीने 50 हजार पैकी 10 हजार 500 रुपये लांबवल्याची घटना घडली आहे.
advertisement
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे . या घटनेमुळे बँकेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
'मोजून देतो बाबा...' तरुणाने भोळ्या शेतकऱ्याचे पैसे मोजून देता देता घातले खिशात, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement