5 वर्षांपूर्वी भावजयीचा खून आता भावाचा खेळ खल्लास, हिंगोलीतील थरकाप उडवणारी घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Hingoli: हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. इथं एका व्यक्तीने आप्या सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केली आहे.
मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली: हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. इथं एका व्यक्तीने आप्या सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं शनिवारी रात्री धारदार शस्त्राने वार करत भावाला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. आरोपीनं हा हल्ला इतक्या निर्दयीपणे केला होता, की भावाला स्वत:चा जीवही वाचवता आला नाही. त्यांचा घरासमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला.
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रामराव संभाजी सूर्यवंशी असं अटक झालेल्या ५० वर्षीय आरोपी भावाचं नाव आहे. तर अशोक संभाजी सूर्यवंशी असं हत्या झालेल्या ६५ वर्षीय भावाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दाती इथं ही घटना घडली. इथं सख्ख्या भावानेच मोठ्या वृद्ध भावाचा धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे. मयत अशोक सूर्यवंशी आणि आरोपी रामराव सूर्यवंशी यांच्यात गेल्या काही काळापासून शेतीच्या आणि पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. शनिवारी रात्री पुन्हा एकदा दोन्ही भावांमध्ये याच कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर लहान भाऊ रामरावने मोठा भाऊ अशोक यांची निर्घृण हत्या केली.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी आरोपी रामराव याने आपल्या भावजयीचा म्हणजेच मयत अशोक सूर्यवंशी यांच्या पत्नीचा देखील शेती व पैशाच्या कारणातून खून केला होता. हा खून पचवल्यानंतर त्याने सख्ख्या भावाचा देखील काटा काढला. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
March 23, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
5 वर्षांपूर्वी भावजयीचा खून आता भावाचा खेळ खल्लास, हिंगोलीतील थरकाप उडवणारी घटना