भुसावळ : स्वत:साठी आणलेली दारू पत्नीने प्यायली, संतापलेल्या पतीचं भयानक कृत्य
- Published by:Shreyas
Last Updated:
स्वत:साठी आणलेली दारू पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने प्यायल्यामुळे पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी
जळगाव, 19 सप्टेंबर : स्वत:साठी आणलेली दारू पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने प्यायल्यामुळे पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. भुसावळजवळच्या हतनूरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. हतनूर धरणावर कामासाठी आलेल्या मजुराने स्वत:साठी प्यायला आणलेली दारू पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने प्यायली, याचा राग पतीला आला आणि त्याने थेट पत्नीचा गळाच दाबला, यामध्ये पत्नीला जीव गमवावा लागला आहे.
advertisement
हतनूरच्या वाढीव दरवाज्याच्या कामासाठी परराज्यातील मजूर कामासाठी आहेत. यापैकी जितेंद्र हेमब्रम आणि शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दोघं तिथे मजुरीतं काम करत होते. जितेंद्र याने स्वत:ला पिण्यासाठी दारू आणली पण पत्नी आणि शेजारी असलेल्या करणी शिवराम यादव या दोघींनी दारू पिऊन टाकली. या दोघींनी दारू प्यायल्याचं समजल्यानंतर जितेंद्र हेमब्रम याला राग आला आणि त्याने पत्नी शांतीदेवीला मारहाण केली. दारूच्या नशेमध्येच जितेंद्रने पत्नीचा गळा दाबला. पत्नीची हत्या झाल्याचं समजताच जितेंद्रने साप चावल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला, पण शवविच्छेदनामध्ये पत्नीची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
Location :
Bhusawal,Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 19, 2023 11:24 PM IST









