Video : फोन घेतल्याचा राग! लहान मुलानं आईच्या डोक्यात घातली बॅट, व्हिडीओ व्हायरल!

Last Updated:

चांगलं वाईट न समजण्याच्या वयात मुलं असा निर्णय फक्त फोनसाठी घेऊ शकतात हे खूपच धक्कादायक आहे. फोनमुळे अंगात अशी राक्षसीवृत्ती येणं हे त्या मुलासाठी, त्याच्या आई-वडिलांसाठी आणि त्यांच्या स्वत:च्या भविष्यासाठी धोक्याचं आहे.

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
मुंबई : आपण असं म्हणतो की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, ते खूप निरागस असतात. पण हल्लीच्या मुलांचा निरागसपणा मोबाईल फोनने हिरावून घेतला आहे. मुलं दिवस रात्र फोनमध्ये असे काही व्यस्त असतात की ते फोनशिवाय दुसरं काहीच करु शकत नाहीत. मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलं मोबाईलने खेळतात. शिवाय खाताना झोपताना, पिताना सगळ्यासाठी मुलांना फोन लागतो. जे खरंच खूप वाईट आहे. मुलं कधीकधी फोनसाठी आपल्या आई-वडिलांचं ऐकत नाही आणि फोन मिळाला नाही किंवा दिला नाही तर धिंगाणा घालायला सुरुवात करतात.
एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एका मुलाला फोननं राक्षस बनवलं आहे. आईने फोन न दिल्याच्या रागाने मुलाने तिच्या डोक्यात लाकडाची बॅट घातली. चांगलं वाईट न समजण्याच्या वयात मुलं असा निर्णय फक्त फोनसाठी घेऊ शकतात हे खूपच धक्कादायक आहे. फोनमुळे अंगात अशी राक्षसीवृत्ती येणं हे त्या मुलासाठी, त्याच्या आई-वडिलांसाठी आणि त्यांच्या स्वत:च्या भविष्यासाठी धोक्याचं आहे.
advertisement
या घटनेसंबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका आईने आपल्या मुलाला मोबाईल घेऊन शिवीगाळ केली, त्यानंतर मुलाने आईवर बॅटने हल्ला केला. पीडितेच्या आईने मोबाईल फोन वापरणाऱ्या आपल्या अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून कानशिलात मारली आणि त्याला अभ्यासाला बसवले. यानंतर मुलगा इतका संतापला की त्याने आईच्या डोक्यावर बॅटने वार केले. त्च्याया एका हल्याने आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली.
advertisement
advertisement
आश्चर्य म्हणजे आपण काही चुकीचं केलंय ही भावना त्या मुलाच्या मनात नव्हती. त्याने आईला बेशुद्ध करून पुन्हा मोबाईल वापरायला सुरुवात केली. घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये मुलाचे संपूर्ण कृत्य कैद झाले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अल्पवयीन मुलगा बेडवर बसून मोबाईल खेळत आहे. त्याची आई त्याला शिव्या देते आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेते आणि त्याला अभ्यासाला बसवते. यानंतर आई स्वत: जेवताना फोनवर बोलू लागते. दरम्यान, मुलगा संधी पाहून आईवर बॅटने हल्ला करतो. एकाच धक्क्याने आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली आणि मुलगा पुन्हा मोबाईल वापरू लागला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.
advertisement
लोकांना मोबाईलशिवाय अपूर्ण वाटते. मोबाईलच्या या व्यसनाला 'नोमोफोबिया' म्हणतात. म्हणजे मोबाईल नसण्याची भीती. भारतातील 4 पैकी 3 लोक नोमोफोबियाने ग्रस्त आहेत. अशा लोकांची इंटरनेट किंवा मोबाईलची बॅटरी संपली तर त्यांना काळजी वाटते.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Video : फोन घेतल्याचा राग! लहान मुलानं आईच्या डोक्यात घातली बॅट, व्हिडीओ व्हायरल!
Next Article
advertisement
Mumbai Crime News: ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा निर्णय, जोगेश्वरीत खळबळ
ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि
  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

View All
advertisement