Nashik News : नाशिक गोळीबार प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, भाजप नेते बागुल यांच्या पुतण्याला अटक

Last Updated:

Nashik Police : नाशिक पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी सुनील बागुल यांच्या पुतण्याला अखेर अटक केली आहे.

नाशिक गोळीबार प्रकरण: भाजप नेते बागुल यांच्या पुतण्याला अटक
नाशिक गोळीबार प्रकरण: भाजप नेते बागुल यांच्या पुतण्याला अटक
नाशिक: नाशिकमध्ये पोलिसांनी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. नाशिक पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी सुनील बागुल यांच्या पुतण्याला अखेर अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांची कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मामा राजवाडे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा यांचा शोध सुरू आहे.
सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली. सचिन कुमावत, पप्पू जाधव या दोघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी या तिघांनाही मध्य प्रदेशातून अटक केल्याची माहिती आहे.
गंगापूरच्या विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाने एकच खळबळ उडाली. राणेनगरात राहणाऱ्या सचिन अरुण साळुंके (वय 28) याच्यावर 29 सप्टेंबर रोजी पहाटे गोळी झाडून अपहरण करण्यात आले. त्यानंतर इतर आरोपी बोरिसा आणि चोथवे यांनी मारहाण केली. या घटनेनंतर पीडित साळुंकेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस अॅक्शनमोडवर आले. गोळीबारानंतर पोलिसांनी तपास केला असता, त्यात अजय बागुलचा समावेश असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मामा राजवाडेची चौकशी केल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.
advertisement
दरम्यान, पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचीही दिवसभरात चौकशी करून सोडून देण्यात आले. तसेच बागूल आणि लाेंढे या टाेळ्यांशी संपर्कात असलेल्या बंटी उर्फ अक्की शेख, इरफान शेख उर्फ चिपड्या, सागर कोकणे, प्रशांत जाधव यांची चौकशी करून साेडून देण्यात आले.

मामा राजवाडेला पोलीस कोठडी...

भाजप नेता सुनील बागुल यांचा समर्थक असलेल्या मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टाने 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या तक्रारीत वैद्यकीय तपासणीनंतर काहीही तथ्य नसल्याचे समोर आले. अटकेआधी मामा राजवाडेची गुन्हे शाखेने 15 तास कसून चौकशी केली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Nashik News : नाशिक गोळीबार प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, भाजप नेते बागुल यांच्या पुतण्याला अटक
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement