Kolhapur News: नवरा-बायको भांडण पाहून हसला; राग मनात ठेवून शेजाऱ्याला स्टीलच्या पाईपने धू-धू धुतला!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील लव्हटेवाडी येथे 25 वर्षीय अजित राजाराम सुतार या तरुणाला, शेजारी राहणाऱ्या नीलेश तानाजी लव्हटेने बेदम...
कोल्हापूर : नवरा-बायकोच्या घरात भांडण सुरू असताना शेजारी राहणारा तरुण मिश्किलपणे हसला, केवळ या गैरसमजातून निर्माण झालेल्या रागातून एकाने घरात घुसून त्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. अजित राजाराम सुतार (वय-25, रा. लव्हटेवाडी, ता. पन्हाळा) असे या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या मारहाणप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात नीलेश तानाजी लव्हटे (रा. लव्हटेवाडी, ता. पन्हाळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुल्ला या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हासल्याचा राग मनात पक्का बसला होता...
जखमी अजित सुतार आणि आरोपी नीलेश लव्हटे यांच्यात पूर्वीपासूनच काही कारणावरून वाद सुरू होता. त्यातच, नीलेशच्या कौटुंबिक वादाच्या वेळी अजित हसल्याचा गैरसमज नीलेशच्या मनात पक्का बसला होता. हाच राग नीलेशच्या मनात खदखदत होता.
advertisement
परत सापडलास, तर जिवंत सोडणार नाही
30 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अजित सुतार आपल्या घरात असताना, नीलेश लव्हटे अचानक तिथे आला. त्याने अजितला शिवीगाळ करत हाताने डोक्यात मारले, तसेच गळपट्टी पकडून त्याला उचलून जमिनीवर आपटले आणि कानशिलात लगावले. इतके करूनही तो थांबला नाही. फेब्रिकेशन व्यवसायासाठी आणलेली स्टीलची पाईप हातात घेऊन त्याने अजितच्या पाठीवर आणि कमरेवर बेदम मारहाण केली. "परत सापडलास तर जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देऊन नीलेश तेथून निघून गेला.
advertisement
जखमी अजित सुतार यांनी 30 जुलै रोजी रात्री सव्वादहा वाजता पन्हाळा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत; मात्र, एका क्षुल्लक गैरसमजातून हाणामारी झाल्याचे परिसरात बोलले जात आहे.
हे ही वाचा : आधी प्रेम, मग अत्याचार! 'या' मुलीला इन्स्टाग्रामवरचं प्रेम पडलं महागात; मुलगा म्हणतोय, "जिवंत सोडणार नाही"
advertisement
हे ही वाचा : पैशांसाठी जावयाचा छळ! सासरच्या जाचाला कंटाळून धावत्या रेल्वेखाली घेतली उडी, तिघांविरुद्ध गुन्हा!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 2:55 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Kolhapur News: नवरा-बायको भांडण पाहून हसला; राग मनात ठेवून शेजाऱ्याला स्टीलच्या पाईपने धू-धू धुतला!