'पप्पा मला वाचवा...', तब्बल 2 तास मृत्यूशी झुंज; इंजिनियर ओरडत राहिलला पण... PM रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Noida Engineer Death Case : युवराजने आपल्या वडिलांना फोन केला आणि "पप्पा, मी खोल खड्ड्यात पडलो आहे, मी बुडतोय... प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये," अशी आर्त हाक मारली.
Engineer Death Case : शुक्रवारी रात्र.. दोन दिवस सुट्टी असल्याने एक सॉफ्टवेअर इंजिनियर आनंदाने आपल्या घराकडे निघाला. दोन दिवस मज्जा करायची असा विचार करत इंजिनियरने आपली गाडी काढली अन् घराच्या दिशेने निघाला. पण बाहेर दाट धुकं होतं अन् बोचरी थंडी... त्यामुळे गाडी चालवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. अशातच दाट धुक्यामुळे विजिबिलिटी शून्य होती आणि रस्त्यावर कोणताही साईन बोर्ड किंवा रिफ्लेक्टर नसल्याने इंजिनियरची गाडी कोसळली. आपण कुठं आहे? याची काहीही माहिती इंजिनियरला नव्हती. आपल्या भोवती पाणी वाढत चाललंय अन् गाडी पाण्यात बुडतीये, याचा अंदाज इंजिनियरला आला अन् समोर मृत्यू दिसू लागला.
मी बुडतोय... प्लीज मला वाचवा....
27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता. सेक्टर-150 मध्ये एका निर्माणाधीन मॉलच्या उघड्या बेसमेंटमध्ये युवराजची विटारा कार कोसळली. रिफ्लेक्टर नसल्याने युवराजला रस्त्यावरील त्या मृत्यूच्या सापळ्याचा अंदाज आला नाही. कार पाण्यात कोसळताच युवराजने आपल्या वडिलांना फोन केला आणि "पप्पा, मी खोल खड्ड्यात पडलो, मी बुडतोय... प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये," अशी आर्त हाक मारली. पण ढिल्ली सिस्टिम अन् मृत्यूच्या दारातून त्याला वाचवता आलं नाही.
advertisement
टॉर्चच्या साह्याने मदतीसाठी ओरडत होता...
वडील राजकुमार मेहता घटनास्थळी पोहोचले तेव्हा युवराज कारच्या टॅबवर उभा राहून टॉर्चच्या साह्याने मदतीसाठी ओरडत होता. मात्र, गोठवणाऱ्या थंडीमुळे आणि खोल पाण्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरण्याचं धाडस दाखवलं नाही. खोल पाण्याच्या भीतीमुळे कोणीही आत उडी मारली नाही. पण पोलिसांनी रस्ती टाकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण काळोख्या अंधारात काहीही दिसलं नाही.
advertisement
वडिलांच्या डोळ्यादेखत बुडाला
युवराज जवळजवळ अडीच तास मदतीची वाट पाहत होता. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अधिकाऱ्यांकडे पुरेसे गोताखोर किंवा योग्य उपकरणे नव्हती. डिलिव्हरी एजंट असलेल्या मोनिंदरने उल्लेखनीय धाडस दाखवले. त्याने कंबरेला दोरी बांधली आणि 70 फूट खोल पाण्यात उडी मारली. पण पहाटे 1:45 वाजताच्या सुमारास गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि युवराज त्याच्या वडिलांच्या डोळ्यादेखत बुडाला.
advertisement
PM रिपोर्टमध्ये काय समोर आलं?
दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्टमधून या घटनेचा अधिक धक्कादायक खुलासा झाला आहे. बर्फासारख्या थंड पाण्यात दोन तास मृत्यूशी झुंज देत असताना आणि भीतीमुळे युवराजला 'कार्डियक अरेस्ट' (हृदयविकाराचा झटका) आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुमारे दोन तास मदतकार्य उशिरा सुरू झाल्याने आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका होतकरू तरुणाचा दुर्दैवी अंत झाला, ज्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
Jan 19, 2026 11:35 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'पप्पा मला वाचवा...', तब्बल 2 तास मृत्यूशी झुंज; इंजिनियर ओरडत राहिलला पण... PM रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर









