धक्कादायक! शेतीसाठी आईचा केला खून, उसाच्या फडात पुरला मृतदेह, नंतर मुलाने स्वतःही घेतला गळफास 

Last Updated:

रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे शेतविक्रीच्या वादातून काकासाहेब वेणुनाथ जाधव (वय-48) या मुलाने त्याची आई समिंद्रबाई जाधव (वय-80) यांचा खून केला. आईचा मृतदेह... 

Crime News
Crime News
रेणापूर (लातूर) : शेती विकण्यास विरोध करत असलेल्या वयोवृद्ध आईचा खून करून मुलानेही आत्महत्या केल्याची टाकणारी घटना घडली आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेनंतर, शुक्रवारी मृत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या माय-लेकांच्या पार्थिवावर एकाच चितेवर सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आधी मुलाची आत्महत्या, नंतर आईचा मृतदेह
सांगवी येथील काकासाहेब वेणुनाथ जाधव (वय-48) याने रेणापूर पिंपळफाटा येथे एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर काही तासांतच, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईचा, समिंद्रबाई वेणुनाथ जाधव (वय-80) यांचाही मृतदेह गावातील शेतात आढळला.
advertisement
पोलिसांनी दोघांचे मृतदेह रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. शुक्रवारी सकाळी दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले, त्यानंतर सांगवी येथे माय-लेकांच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उसाच्या फडात पुरला होता मृतदेह
या घटनेची सविस्तर माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. काकासाहेबचा मुलगा म्हणाला की, "माझे वडील आजीकडे शेत विकायचे म्हणत होते, पण आजी त्याला सतत विरोध करत होती." याच रागातून वडील काकासाहेब यांनी आजी समिंद्रबाईंना जबर मारहाण केली आणि तोंड दाबून त्यांचा जीव घेतला.
advertisement
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी आजीचा मृतदेह स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे रेणापूर पोलीस ठाण्यात मृत काकासाहेब जाधव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिंद्रबाईंना चार मुली आणि एक मुलगा होता. सर्वांचे लग्न झाले होते. काकासाहेबनेच आईचा खून केला आणि स्वतः आत्महत्या केली, अशी माहिती आता समोर आली आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
धक्कादायक! शेतीसाठी आईचा केला खून, उसाच्या फडात पुरला मृतदेह, नंतर मुलाने स्वतःही घेतला गळफास 
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement