VIDEO: 'सोडून टाक आप्पा, मला मारायचे ख्वाब', भाईगिरी करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी जिरवली, हात जोडून रडला

Last Updated:

Crime in Jalgaon: पाचोऱ्यात सोशल मीडियावर भाईगिरी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी धमकी देणारे रील बनवणाऱ्या तरुणाची जिरवली आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी पाचोरा: मागील काही दिवसांपासून जळगावात सोशल मीडियावर धमकीचे व्हिडीओ शेअर करत भाईगिरी करणाऱ्या तरुणांचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी पाचोरा येथील आकाश मोरे नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत गोळ्या घालण्याची भाषा केली. पण धमकी देणाऱ्या तरुणालाच दोघांनी पाचोरा बस स्थानक परिसरात तब्बल १२ गोळ्या घालून हत्या केली.
ही घटना ताजी असताना सोशल मीडियावर तरुणांची दादागिरी सुरूच आहे. पण पाचोऱ्यात सोशल मीडियावर भाईगिरी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी धमकी देणारे रील बनवणाऱ्या तरुणाची चांगलीच जिरवली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवल्या. यानंतर धमकी देणाऱ्या तरुणाने रडत, हात जोडून माफी मागितली आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
गणेश बागुल असं सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथे सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून भाईगिरी करत होता. पण भाईगिरी करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत चांगलीच अद्दल घडवली आहे. आरोपी गणेश याने पाचोरा बस स्थानकात रीलच्या माध्यमातून भाईगिरी केली होती.
advertisement
'सोडून टाक आप्पा, मला मारायचे ख्वाब, तुमच्या पण टॉपचा आणलाय मी बाप...' असा आशय असलेला रील आरोपी गणेश बागुलने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. पोलिसांनी या रीलची दखल घेत. आरोपीला धडा शिकवला आहे. तसेच आरोपीचा माफी मागतानाचा नवीन व्हिडीओ काढून त्याची दहशत संपवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. आता हे दोन्ही रील व्हायरल होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
VIDEO: 'सोडून टाक आप्पा, मला मारायचे ख्वाब', भाईगिरी करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी जिरवली, हात जोडून रडला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement