Sonam Raghuwanshi : राजाच्या मारेकऱ्यांचा गेम ओव्हर! चुकून कॅमेऱ्यात दिसले 3 आरोपी, नवा Video समोर

Last Updated:

Indore Missing Couple Latest News :आता या प्रकरणाला वळण देणारा व्हिडीओ समोर आला आहे. राजाची हत्या होण्यापूर्वी काही मिनिटे आधीचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे.

राजाच्या मारेकऱ्यांचा गेम ओव्हर, चुकून कॅमेऱ्यात दिसले 3 आरोपी, नवा व्हिडीओ समोर
राजाच्या मारेकऱ्यांचा गेम ओव्हर, चुकून कॅमेऱ्यात दिसले 3 आरोपी, नवा व्हिडीओ समोर
इंदूर : इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्यांची पत्नी सोनम, प्रियकर राज आणि मारेकऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांकडून सोनम आणि आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. तर, दुसरीकडे आता या प्रकरणाला वळण देणारा व्हिडीओ समोर आला आहे. राजाची हत्या होण्यापूर्वी काही मिनिटे आधीचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे.
राजा रघुवंशीच्या हत्येच्या अगदी आधी दोन वेगवेगळे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडीओत राजा, आरोपी सोनम रघुवंशी, विशाल, आकाश आणि आनंद दिसत आहेत. या व्हिडिओंमध्ये आनंद कुर्मी वगळता, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि सोनम रघुवंशी यांनी व्हाइट शर्ट घातला असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडिओ इन्स्टा युजर देव सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी याआधी पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता.
advertisement

पहिला व्हिडीओ...

सोमवारी पहिला व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत मेघालयातील डबल डेकर रूट ब्रिजवर प्रवास करताना एका पर्यटकाने हा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनमचे फूटेज दिसून आले आहे. हा व्हिडीओ 23 मे 2025 रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या आसपासचे आहे. सोनम पुढे चालत असून राजा तिच्या मागे चालत असल्याचे दिसून आले आहे. सोनमने यावेळी व्हाइट शर्ट घातला असल्याचे दिसून आले आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Dev (@m_devsingh)



advertisement

दुसरा व्हिडीओ समोर, आरोपीदेखील दिसले...

देव सिंह यांनी पोस्ट केलेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये, हत्येचे आरोपी विशाल चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत हे तिघेही एकत्र ट्रेकिंग करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, विशाल सगळ्यात पुढे आहे आणि तो थेट कॅमेऱ्याकडे पाहत आहे. त्याने व्हाइट शर्ट देखील घातला आहे. कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी आनंद आपला चेहरा बाजूला करतो आणि कॅमेरा त्याच्या जवळ येताच आकाशने मान खाली घातली. त्याच्या लांब केसांमुळे त्याचा चेहरा लपला गेला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आकाशने देखील व्हाइट शर्ट घातला आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Dev (@m_devsingh)



advertisement
या दोन्ही व्हिडीओमध्ये राजा रघुवंशी, सोनम आणि आरोपींनी व्हाइट शर्ट घातला असल्याचे दिसून आले आहे. हत्येच्या दिवशी एकाच रंगाचे शर्ट घालण्याचे कारण काय, असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हा पूर्वनियोजित कट असल्याच्या चर्चांना बळकटी मिळत आहे. ट्रेकिंगच्या निमित्ताने राजाला फसवणूक करून त्याला संपवले का, हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
advertisement

मेघालय पोलिसांनी काय सांगितले?

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मेघालय पोलीस महासंचालक इदाशिशा नोंगरांग यांनी सोमवारी सांगितले की, या हत्ये मागे फक्त लव्ह ट्रँगल हे एकमेव कारण असेल असे आम्ही मानत नाही. या प्रकरणात आणखी काही पैलू आहेत का, याचा आम्ही तपास करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. लग्नाच्या काही दिवसातच पतीबद्दल इतका टोकाचा द्वेष निर्माण होणे हे दुर्मिळ प्रकरण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मराठी बातम्या/क्राइम/
Sonam Raghuwanshi : राजाच्या मारेकऱ्यांचा गेम ओव्हर! चुकून कॅमेऱ्यात दिसले 3 आरोपी, नवा Video समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement