Sangli News: एका वाक्यानं डोकं फिरलं, 18 वर्षाच्या तरुणाचा जागेवरच खेळ खल्लास, सांगली हादरली!
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sangli News: सुजल हा सतत जॅकेटमध्ये हात घालत होता. त्यामुळे चेतन याने त्याच्याजवळ जाऊन जॅकेट चाचपले.
सांगली: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग अनावर झाल्याने सांगलीतील एकाने टोकाचे पाऊल उचलले. शामरावनगर परिसरात एकाला कायमचे संपवले असून या घटनेने खळबळ उडाली आहे. चेतन आप्पासाहेब तांतळे असे मृत 18 वर्षीय तरुणाचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. या प्रकरणात सुजल उर्फ पाप्या चंद्रकांत वाघमोडे याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रामनगरच्या पहिल्या गल्लीत राहणारा चेतन आप्पासाहेब तांदळे हा पोलीस रेकॉर्डवरील अठरा वर्षीय गुन्हेगार आहे. त्याने शुक्रवारी रात्री दाबेली गाडीवर सुजल उर्फ पाप्या चंद्रकांत वाघमोडे याला कानाखाली चापट मारली होती. त्यामुळे सुजलने मामा तसेच दोन साथीदारांना घेऊन चेतनचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर सुजल उर्फ पाप्या वाघमोडे, भाऊ शुभम वाघमोडे, राहुल जाधव, सुजलचा मामा विनोद डांगे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विनोद डांगे याला ताब्यात घेतले आहे.
advertisement
शुक्रवारी रात्री चेतन आणि मित्र हर्षवर्धन गायकवाड हे दोघेजण वरद कॉलनी शामरावनगर येथे दाबेली खाण्यासाठी थांबले होते. तेव्हा सुजल आणि विनोद डांगे येथे दुचाकीवरून आले. सुजल हा सतत जॅकेटमध्ये हात घालत होता. त्यामुळे चेतन याने त्याच्याजवळ जाऊन जॅकेट चाचपले. तेव्हा कमरेला चाकू असल्याचे आढळले. 'चाकू घेऊन का फिरतोस?' म्हणून चेतन याने त्याच्या कानाखाली चापट मारली. तेव्हा सुजल व विनोद तेथून निघून गेले.
advertisement
चेतन व हर्षवर्धन दुचाकीवरून जात असताना सुजलचा भाऊ शुभम याने त्याला थांबवले. तू सुजलला का मारलेस म्हणून जाब विचारला. दोघांमध्ये वाद सुरू असताना सुजल, मामा विनोद, राहुल जाधव तेथे आले. त्यांनी चेतनवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. गर्दी जमल्यानंतर चौघेजण दुचाकीवरून पळाले, चेतनच्या गळ्यात घुसलेला चाकू तसाच होता. डोक्यात, पोटावर, गळ्यात खोलवर वार झाल्याने रक्तस्त्राव होऊन तो जागीच मृत झाला.
advertisement
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून भर रस्त्यावर खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 11:53 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Sangli News: एका वाक्यानं डोकं फिरलं, 18 वर्षाच्या तरुणाचा जागेवरच खेळ खल्लास, सांगली हादरली!









