'हप्ते भरा, जादा पैसे मिळवा'; जाळ्यात अडकवून बचत गट प्रतिनिधी महिलेला 8 लाखांचा गंडा!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर येथील अर्चना दिलीप बेळुंखे या बचत गटाच्या प्रतिनिधीची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. 1 ते 17 जुलैदरम्यान...
जत (सांगली) : जत तालुक्यातील डफळापूर येथील एका बचत गटाच्या प्रतिनिधी असलेल्या महिलेची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समाजमाध्यमाद्वारे (social media) लिंक पाठवून 'हप्ते भरा, जादा पैसे देऊ', अशी बतावणी करत त्यांची 8 लाख 5 हजार 810 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी अर्चना दिलीप बेळुंखे (वय-32, रा. विठ्ठलनगर, डफळापूर) या महिलेने जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला असून, हे प्रकरण अधिक तपासासाठी सायबर गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.
'टास्क' पूर्ण करण्याच्या नावाखाली फसवले!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 1 ते 17 जुलैदरम्यान घडला. अर्चना बेळुंखे यांच्या मोबाईलमधील 'अर्चना बेळुंखे' नावाच्या टेलिग्राम अकाउंटवर 'आर्या फातिमा' आणि 'अर्जुन प्रसाद' या युजरनेम असलेल्या टेलिग्राम खातेधारकांनी त्यांना एक लिंक पाठवली. त्यानंतर त्यांना वेगवेगळे 'टास्क' देऊन ते पूर्ण केल्यानंतर पैसे देण्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले. अर्चना बेळुंखे यांनी सांगितल्यानुसार पैसे भरले, पण प्रत्यक्षात त्यांना काहीच मिळाले नाही. वेगवेगळ्या बचत खात्यांद्वारे एकूण 8 लाख 5 हजार 810 रुपयांची ही फसवणूक झाली आहे.
advertisement
अशी झाली फसवणूक
- सुरुवात : बेळुंखे यांना सुरुवातीला 800 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्याचा परतावा म्हणून त्यांना 1000 रुपये परत पाठवण्यात आले. यामुळे त्यांचा विश्वास बसला.
- दुसरा टप्पा : त्यानंतर 1 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याचा परतावा म्हणून त्यांना 3 हजार रुपये मिळाले.
- फसवणुकीचा डाव : विश्वास बसल्यानंतर त्यांना 1 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. मात्र, यावेळी त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही.
- परताव्यासाठी टाळाटाळ : जेव्हा त्यांनी परताव्याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांना, "एकदम पैसे देता येणार नाहीत, त्याकरिता टॅक्स लागेल. टॅक्स भरून नियमित झाल्यानंतर पैसे मिळण्यास थोडा वेळ लागेल," असे सांगण्यात आले.
advertisement
अशा वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवत त्यांची तब्बल 8 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी आता गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : रातोरात खात्यात 1,13,55,00,00,000 कोटी! गरीब मुलगा बनला अरबपती, बँक बॅलन्स पाहून बसला शॉक
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 9:25 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'हप्ते भरा, जादा पैसे मिळवा'; जाळ्यात अडकवून बचत गट प्रतिनिधी महिलेला 8 लाखांचा गंडा!


