advertisement

Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण म्हणजे फक्त ट्रेलर, खरा पिक्चर वेगळाच? समाधान मुंडेबाबत खळबळजनक अपडेट

Last Updated:

Crime in Beed: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मारहाणार करणाऱ्या समाधान मुंडेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

News18
News18
बीड: बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला अलीकडेच मुंडे गँगकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. १० ते १२ जणांनी शिवराजचं अपहरण करून त्याला डोंगरात नेलं. त्याठिकाणी आरोपींनी रिंगण करून बेदम मारहाण केली. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आधीच बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं आहे. अशात शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीनंतर बीडमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही? असा सवाल विचारला जातोय.
दरम्यान, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. दिवटेला झालेली मारहाण केवळ ट्रेलर आहे. खरा पिक्चर मात्र वेगळाच असल्याचं समोर आलं आहे. खरं तर, शिवराज दिवटेला झालेली मारहाण ही बदल्यातून झाल्याचं सांगितलं जातंय. कारण दिवटेला मारहाण करताना व्हिडीओत दिसणाऱ्या लांब केस असलेल्या समाधान मुंडेला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. त्यामुळे समाधान मुंडेला आधी मारहाण झाली होती, याचाच बदला घेण्यासाठीच दिवटेला मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

16 मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला परळी तालुक्याच्या लिंबोटी येथील रहिवासी असणारा शिवराज दिवटे मित्रांसोबत गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर मुंडे गँगने शिवराजचं अपहरण करून डोंगरात नेलं. तिथे आरोपींनी रिंगण करून बेदम मारहाण केली. त्यानंतर पायाही पडायला लावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
advertisement
शिवराजच्या जबाबावरून पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. एकीकडे शिवराज दिवटे मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत असताना, आता जलालपूरमध्ये समाधानलाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ देखील रविवारी व्हायरल झाला. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण म्हणजे फक्त ट्रेलर, खरा पिक्चर वेगळाच? समाधान मुंडेबाबत खळबळजनक अपडेट
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement