Sonam Raghuwanshi : राजाला सुपारीसाठी नव्हतं संपवलं! सोनमसाठी तीन मारेकरी का तयार झाले? समोर आलं धक्कादायक कारण
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sonam Raghuwanshi Latest News : विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या तिन्ही मुलांनी सोनमच्या सांगण्यावरून राजाची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. मात्र, या तिघांनी पैशांसाठी राजाला संपवलं नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
Sonam Raghuwanshi : इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांच्यासह राजाची हत्या करणारे तिन्ही आरोपी सध्या मेघालय पोलिसांच्या कोठडीत आहेत. यादरम्यान, सोनम आणि राज यांनी पोलीस चौकशीत राजाची हत्या करण्याचा कट रचल्याचे कबूल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर, राजाच्या हत्या करण्याचा कट रचल्याचेही समोर आले आहे. लग्नाच्या 11 दिवस आधी राजाची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे वृत्त आहे. विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या तिन्ही मुलांनी सोनमच्या सांगण्यावरून राजाची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. मात्र, या तिघांनी पैशांसाठी राजाला संपवलं नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
सोनम आणि राज यांनी राजाची हत्या करण्यासाठी तिघांना सुपारी दिल्याचे म्हटले जात होते. परंतु एका वृत्तसंकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी कॉन्ट्रॅक्ट किलिंगचे दावे फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की तिन्ही मुले राज कुशवाहाचे ओळखीचे आहेत. त्यापैकी एक राजचा चुलत भाऊही असल्याचे त्यांनी म्हटले.
या कारणासाठी तिन्ही मुलांनी राजाला संपवले...
advertisement
पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी पैशासाठी राजाची हत्या केली नाही. तर राजशी असलेली निष्ठा आणि दीर्घकाळची मैत्री या कारणासाठी त्यांनी राजाची हत्या केली आणि सोनमसाठी काम केले. सोनमने इशारा दिल्यानंतरच विशालने प्रथम राजावर हल्ला केला, त्यानंतर इतर दोन आरोपींनी हल्ला करून त्याला ठार मारले. हे सर्व सोनमच्या डोळ्यासमोर घडले. त्यानंतर सोनमने राजाचा मृतदेह खड्ड्यात टाकण्यात तिन्ही मुलांना मदत केली असल्याचे समोर आले आहे.
advertisement
सोनम आणि राजा 23 मे रोजी बेपत्ता झाले होते. मेघालय पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीमही राबवली, त्यानंतर 2 जून रोजी पोलिसांना राजाचा मृतदेह खड्ड्यात सापडला. मृतदेह खूपच वाईट अवस्थेत होता. पण सोनम अजूनही बेपत्ता होती. यानंतर, पोलिसांना राजाच्या हत्येत वापरलेला चाकू, त्याची स्कूटी आणि रेनकोट देखील सापडला. यानंतर, पोलिसांनी त्यांच्या तपासाचा दृष्टिकोन बदलला आणि सोनमशी संबंधित सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सोनम आणि राजा ज्या होमस्टेवर राहत होते त्या होमस्टेपासून, त्यांना पाहणाऱ्या गाईडपासून, सोनमच्या कॉल डिटेल्सपर्यंत, पोलिसांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची चौकशी सुरू केली. सोनमच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांना कळले की सोनम राज कुशवाह नावाच्या माणसाशी सतत संपर्कात होती. त्यानंतर, पोलिस तपास पुढे गेला आणि 8 जूनच्या रात्री राज कुशवाहाला अटक करण्यात आली.
advertisement
राजाच्या हत्येनंतर सोनम इंदूरमधील एका गुप्त फ्लॅटमध्ये वास्तव्य...
समोर आलेल्या माहितीनुसार, राजाच्या हत्येनंतर सोनमने रस्ता बदलत इंदूर गाठले. सोनमही 30 जून ते 7 जूनपर्यंत तिथेच राहिली. पण राजाला पकडल्यानंतर ती घाबरली आणि गाजीपूरमधील काशी नावाच्या ढाब्यावर गेली, तिच्या मालकाचा फोन घेतला आणि तिच्या कुटुंबाला फोन केला आणि तिचे ठिकाण सांगितले. यानंतर, सोनमचा भाऊ गोविंद आणि ढाब्याच्या मालकाने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेतले. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. पोलीस चौकशीदरम्यान, सोनमने प्रथम तिच्या अपहरणाची खोटी कहाणी सांगून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण चौकशीचा फास आवळताच आणि पोलिसी खाक्या दाखवताच तिने हत्येची कबुली दिली.
Location :
Indore,Indore,Madhya Pradesh
First Published :
June 17, 2025 1:41 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Sonam Raghuwanshi : राजाला सुपारीसाठी नव्हतं संपवलं! सोनमसाठी तीन मारेकरी का तयार झाले? समोर आलं धक्कादायक कारण