बीड: परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात शिवजलं मांसाहार, संतप्त VIDEO समोर, कामगारांची हकालपट्टी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात चक्क मांसाहार शिजवून खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
परळी: बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात चक्क मांसाहार शिजवून खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचा व्हिडीओ देखील समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यनाथ मंदिर परिसर विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून दर्शन मंडपाचे बांधकाम सुरू आहे. परप्रांतीय मजुरांकडून हे काम करून घेतलं जात आहे. काम करत असताना या मजुरांनी मंदिर परिसरात मांसाहरी जेवण शिजवून खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात सध्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विविध विकासकामे सुरू आहेत. मंदिराच्या पूर्व घाटाशेजारी दर्शन मंडपाची नवीन इमारत उभारली जात आहे. या इमारतीला लागूनच वैद्यनाथांचे मंदिर आहे. या कामाची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९ मे रोजी पाहणी केली होती. कामातील त्रुटी पाहून अजित पवारांनी कंत्राटदारास फैलावर घेतलं होतं. याच इमारतीसाठी कंत्राटदाराने परराज्यातून मजूर आणलेले आहेत.
advertisement
या मजुरांनी वैद्यनाथ मंदिराच्या या निर्माणाधीन दर्शन मंडपातच अंडे आणि मांस शिजवून खाल्लं आहे. हा प्रकार शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी उघडकीस आणला. दरम्यान ऑमलेट, मांस शिजविणाऱ्या कामगारांना आता कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय वैद्यनाथ मंदिर परिसरात ऑमलेट, मांस शिजवलेल्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण ही करण्यात आले आहे. यावेळी परिसरात काही काळ गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. आता याच जागेचे भाविकांकडून गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आले आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jun 02, 2025 7:20 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बीड: परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात शिवजलं मांसाहार, संतप्त VIDEO समोर, कामगारांची हकालपट्टी









