advertisement

कत्ती घेऊन पत्नीला मारायला गेला अन् स्वत:वर डाव उलटला, बायकोकडून खेळ खल्लास

Last Updated:

Crime in Hingoli: हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे.

Ai Generated Image
Ai Generated Image
मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली: हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मयत पतीच पत्नीला मारण्यासाठी अंगावर धावून आला होता. मात्र पत्नीने पतीच्या हातातील शस्त्र हिसकावून घेत, त्याच्यावरच वार केला. या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला.

बायकोला मारण्यासाठी कत्ती घेऊन गेला अन्...

कैलास गलंडे असं मयत पतीचे नाव आहे. तो आपली पत्नी सुमित्रा गलंडे हिच्यासह सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव इथं राहत होता. त्याला दारुचं व्यसन होतं. तो दारू पिऊन अनेकदा सुमित्राला त्रास द्यायचा. घटनेच्या दिवशी देखील त्याने मद्यसेवन केलं होतं. यावेळी वाद झाल्यानंतर तो हातात कत्ती घेऊन पत्नी सुमित्रा गलंडे हिला मारण्यासाठी अंगावर धावून गेला. पण हा डाव त्याच्यावरच उलटला.
advertisement
झटापटीत पत्नी सुमित्राने कैलासच्या हातातील कत्ती हिसकावून घेतली आणि त्याच्याच डोक्यात वार केला. हा वार इतका गंभीर होता की, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पतीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या सुमित्राने मोटरसायकल मधील पेट्रोल मयत पतीच्या अंगावर ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच पतीने दारुच्या नशेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, असा बनाव देखील तिने रचला.
advertisement

शवविच्छेदन अहवालातून उलगडलं सत्य

मात्र तिचा बनाव फार काळ टिकला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात कैलासच्या डोक्याला गंभीर मार आढळल्याचे दिसून आले. डोक्याला लागलेला मार दिसून आल्याने आरोपी सुमित्रा गलंडे हिचे बिंग फुटले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी पत्नी सुमित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पत्नीनेच पतीची अशाप्रकारे हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
कत्ती घेऊन पत्नीला मारायला गेला अन् स्वत:वर डाव उलटला, बायकोकडून खेळ खल्लास
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement