advertisement

नवरा पुण्यात जॉबला, बायको जळगावात, एका संशयानं संसार उद्ध्वस्त, विवाहितेचं भयंकर पाऊल

Last Updated:

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. इथं एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

News18
News18
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. इथं एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. मयत महिलेचा पती पुण्यात नोकरीला असतो. तो नोकरीवर असताना सासरी घडलेल्या आक्रीत घटनेमुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

घराच्या वरच्या मजल्यावर आत्महत्या

मनीषा सागर पल्लीवाळ (सोनार) असं आत्महत्या करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेचं नाव आहे. ते एरंडोल च्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या परिसरात आपल्या सासरी राहत होती. सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मनीषाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील सिलींगच्या कडीला अडकवलेल्या दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
advertisement

नवरा पुण्यात नोकरी, बायको जळगावात सासरी

याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला मृत महिलेचे भाऊ मनोज माधवराव पोतदार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा हीचा सागर पल्लीवाळ ( सोनार ) यांच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला. त्यांना शर्विल नावाचा ९ वर्षांचा मुलगा आहे. सागर पल्लीवाळ हा पुणे येथे नोकरीस असून तो पुण्यातच राहतो. मनीषा मात्र मुलासोबत एरंडोल येथे सासरी राहायची. तिचा पती सागर अधूनमधून एरंडोल येथे यायचा.
advertisement

अंगावर लाल रंगाचे व्रण

तिचा पती सागर पल्लीवाळ, सासू मंगला पल्लीवाळ, दीर गणेश पल्लीवाळ, भावजय सुषमा पल्लीवाळ हे मनीषावर चारित्र्याचा संशय घ्यायचे. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे. या छळाला कंटाळून मनीषाने गुरुवारी ५ जूनला राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेची माहिती माहेरकडील मंडळींना मिळताच ते एरंडोल येथे आले. ज्यावेळी त्यांनी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली, तेव्हा मनीषाच्या शरीरावर, गळ्यावर लाल रंगाचे व्रण पडल्याचं दिसलं. यानंतर मनीषाच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
नवरा पुण्यात जॉबला, बायको जळगावात, एका संशयानं संसार उद्ध्वस्त, विवाहितेचं भयंकर पाऊल
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement