Actress Bomb Threat: 'घरात बॉम्ब ठेवलाय...' प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली धमकी, पोलिसांची धावपळ; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Actress House Bomb Threat:आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका प्रसिद्ध अभिनेत्रीला घरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आणि एकच खळबळ उडाली.

प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली धमकी
प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली धमकी
मुंबई : कलाकारांनाचं जेवढं कौतुक होतं तेवढंच त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. अनेकदा तर धमक्यांचे फोन येतात, घरावर गोळीबार होतो, दगडफेक केला जातो, अशा घटनाही पाहायला मिळतात. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका प्रसिद्ध अभिनेत्रीला घरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आणि एकच खळबळ उडाली.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णनविषयी महत्त्वाची बातमी समोर आलीय. 2 ऑक्टोबरच्या रात्री तिला घरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी चेन्नई पोलिस कंट्रोल रूमला फोन करून कोणीतरी त्रिशाच्या तेयनमपेट येथील घरात स्फोटक असल्याचा दावा केला.
advertisement
पोलिसांनी वेळ न दवडता बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि स्निफर डॉग्ससोबत तिच्या घराची कसून झडती घेतली. जवळजवळ दोन तास चाललेल्या या कारवाईत मात्र काहीही संशयास्पद सापडले नाही. अखेर ही धमकी बनावट कॉल असल्याचे स्पष्ट झाले. पण, गेल्या काही महिन्यांत अशा फेक कॉल्सची संख्या वाढल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. प्रत्येक वेळी ही धमकी खोटी निघाली असली, तरी कोणतीही जोखीम न घेता अधिकाऱ्यांकडून कडक सुरक्षा उपाय केले जात आहेत.
advertisement
दरम्यान, त्रिशा सध्या तिच्या करिअरच्या सुवर्णकाळात आहे. ती लवकरच मेगास्टार चिरंजीवीसोबत “विश्वम्भरा” या भव्य चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक वसिष्ठ यांच्या दिग्दर्शनाखाली आणि यूव्ही क्रिएशन्सच्या निर्मितीखाली तयार होत असून, हा एक सामाजिक-काल्पनिक (socio-fantasy) अ‍ॅक्शन ड्रामा असेल. 2026 मध्ये तो प्रेक्षकांसमोर येईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय त्रिशा अभिनेता सूर्यासोबत “करुप्पू” या जबरदस्त अ‍ॅक्शन एंटरटेनरमध्येही दिसणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Actress Bomb Threat: 'घरात बॉम्ब ठेवलाय...' प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली धमकी, पोलिसांची धावपळ; नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement