'...नाहीतर अडल्ट पप्पी देईन', घरात येताच गौरव खन्नाच्या बायकोने बिग बॉसला दिली धमकी, पुढे जे झालं... VIDEO

Last Updated:

Gaurav Khanna Akanksha Chamola Bigg Boss 19 : एका प्रोमोमध्ये अभिनेता गौरव खन्नाला सपोर्ट करण्यासाठी त्याची पत्नी, अभिनेत्री आकांक्षा चमोलाची एंट्री झाली. पण 'बिग बॉस'च्या टास्कला कंटाळून आकांक्षाने चक्क बिग बॉसलाच धमकी दिली.

News18
News18
मुंबई: 'बिग बॉस १९' चा फिनाले अवघ्या तीन आठवड्यांवर आला असताना, घरात सध्या 'फॅमिली वीक' सुरू आहे. ज्यांच्या भेटीची स्पर्धक पहिल्या दिवसापासून वाट पाहत असतात, ती वेळ अखेर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये अभिनेता गौरव खन्नाला सपोर्ट करण्यासाठी त्याची पत्नी, अभिनेत्री आकांक्षा चमोलाची एंट्री झाली. पण 'बिग बॉस'च्या फनी टास्कला कंटाळून आकांक्षाने चक्क बिग बॉसलाच धमकी दिली.
प्रोमोमध्ये गौरव खन्ना आपल्या कुटुंबाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसते. आकांक्षाची घरात एंट्री होताच गौरव खूप इमोशनल होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो. गौरव तिच्याजवळ येताच 'बिग बॉस' त्याला फ्रीज करतात. त्यामुळे त्याला पत्नीला भेटता येत नाही. काही वेळानंतर रिलीज होताच गौरव तिला घट्ट मिठी मारतो आणि तिच्या गालांवर किस करतो.
advertisement

आकांक्षाची बिग बॉसला धमकी

नंतर दोघे लिव्हिंग रूममध्ये येताच 'बिग बॉस' गौरव खन्नाला पुन्हा फ्रीज करतात. यामुळे आकांक्षाचा पारा चढतो, पण ती खूप मजेशीर पद्धतीने बिग बॉसला धमकी देते. पतीला भेटता येत नाहीये, हे पाहून आकांक्षाने थेट बिग बॉसलाच चॅलेंज दिले. आकांक्षा मजेशीर अंदाजात म्हणाली, "रिलीज करा, नाहीतर मी गौरव खन्नाला आता अडल्ट वाली पप्पी देईन."
advertisement
आकांक्षाचे हे बोलणे ऐकून मागे उभा असलेला स्पर्धक अमाल मलिक लगेच ओरडतो, "हो दे, दे, दे!" त्यावर बिग बॉस मिश्किलपणे म्हणतात, "गौरव... काही नाही!" हे ऐकून घरातील सर्व स्पर्धक आणि आकांक्षा जोरजोरात हसू लागतात.
advertisement
advertisement

फॅमिली वीकची धमाल

'बिग बॉस १९' मधील फॅमिली वीकची सुरुवात कुनिका सदानंद यांच्या मुलाच्या एंट्रीने झाली. कुनिका यांनी त्यांचा मुलगा अयान लाल याची भेट होताच मिश्किलपणे त्याचं आणि अशनूरचे लग्न लावून देण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर अशनूरचे वडील आल्यावरही तिने तोच प्रस्ताव ठेवला, ज्यामुळे घरात एकच हशा पिकला. याशिवाय फरहानाची आई देखील तिला सपोर्ट करण्यासाठी घरात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'...नाहीतर अडल्ट पप्पी देईन', घरात येताच गौरव खन्नाच्या बायकोने बिग बॉसला दिली धमकी, पुढे जे झालं... VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement