Parth Pawar: मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लिनचीट? मुठे समितीचा अहवाल समोर

Last Updated:

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुंद्राक विभागाचा अहवाल सादर झाला असून यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18
News18
पुणे : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लिन चीट मिळाली का? असा सवाल उपस्थित होत आहे. मुंद्राक अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवार यांचे नाव नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या अहवालात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांचे नाव अहवालात असून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुंद्राक विभागाचा अहवाल सादर झाला आहे. या अहवालात पार्थ पवारांचे नाव नाही. कंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील, बिल्डर शितल तेजवानी आणि निलंबीत उपनिंबंधक रवींद्र तारुंचा अहवालात उल्लेख असून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. राज्य सरकार आणि महसूल विभागाकडून मुठे समिती सादर करण्यात आली होती. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. सहनोंदणी महानिरिक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्यास निर्देश देण्यात आले होते.
advertisement

विभागीय समितीला मुठे समितीचा अहवाल सादर

विभागीय समितीला मुठे समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण अहवालात पार्थ पवार यांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अहवालात पार्थ पवार यांचे नाव आहे. कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आत्ता देखील अहवालात देखील पार्थ पवार यांचे नाव नाही. नव्याने कोणतेही अधिकारी या प्रकरणात नाही असे देखील अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. गैरव्यवहार रोखण्यासाठी अहवालातून शिफारस करण्यात आली आहे.
advertisement

नेमकं काय आहे प्रकरण? 

पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागात तब्बल 40 एकर जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये होती, पण ती केवळ 300 कोटींमध्ये विकत घेतल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे, तर या व्यवहारावर लागणारी सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटीही काही कागदी कारवायांद्वारे माफ करून घेण्यात आली. अखेर फक्त 500 रुपयांमध्ये एवढा मोठा व्यवहार पूर्ण झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात पार्थ पवारांची अमेडिया कंपनी चर्चेत आली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Parth Pawar: मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लिनचीट? मुठे समितीचा अहवाल समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement