बॉलिवूडमध्ये घडतंय तरी काय? ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चननंतर अजय देवगणची कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ajay devgan: नुकतंच अजयसोबत अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे त्याला थेट कोर्टात धाव घ्यावी लागली आहे. काय घडलं सविस्तर जाणून घ्या.
मुंबई: बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा अजय, खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय शांत स्वभावाचा आहे. मात्र, नुकतंच अजयसोबत अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे त्याला थेट कोर्टात धाव घ्यावी लागली आहे.
अजय देवगणने आपल्या पर्सनॅलिटी राईट्सच्या संरक्षणासाठी थेट दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसाठी त्यांच्या चेहऱ्याचा, नावाचा आणि आवाजाचा अनधिकृत वापर वाढत असताना, ही कायदेशीर लढाई आता एक गंभीर मुद्दा बनत चालली आहे.
सेलिब्रिटीचा चेहरा म्हणजे मालमत्ता
मनोरंजन क्षेत्राचे संपूर्ण अर्थकारण कलाकारांच्या ओळखीच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या प्रसिद्धीवर अवलंबून असते. मात्र, सध्या AI तंत्रज्ञानाचा वापर करून डीपफेक व्हिडीओ आणि बनावट जाहिरात करार वाढले आहेत. यामुळे सेलिब्रिटींच्या नाव आणि प्रतिमा यांच्या कमर्शिअल गैरवापराला वेग आला आहे. वकील आणि ब्रँड व्यवस्थापकांच्या मते, यामुळे केवळ कलाकारांची प्रतिमा खराब होत नाही, तर स्टुडिओ, जाहिरातदार आणि प्लॅटफॉर्मला मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
advertisement
गेल्या काही महिन्यांमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांनी आपल्या प्रतिमेच्या अनधिकृत वापराबाबत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय
न्यायालयांनी या प्रकरणांमध्ये दिलेले तात्पुरते निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत. या निर्णयांमुळे, सेलिब्रिटींच्या पर्सोनाला म्हणजेच त्यांच्या सार्वजनिक ओळखीला, सामान्य गोपनीयतेच्या नियमांपलीकडे जाऊन कायदेशीर संरक्षण आणि आर्थिक मूल्य आहे, हे सिद्ध झाले आहे. आता टॅलेंट मॅनेजर, स्टुडिओ आणि ब्रँड्स स्टार्सच्या प्रतिमा आणि आवाजांना बौद्धिक मालमत्ता म्हणून पाहू लागले आहेत. याच्या अनधिकृत वापरामुळे ब्रँडचे नुकसान होऊ शकते किंवा त्यांचे परवाना शुल्क रद्द होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
advertisement
मार्केटिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एका व्हायरल क्लिपमुळे किंवा AI-जनरेटेड प्रतिमेमुळे काही तासांत लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते. त्यामुळे, सेलिब्रिटीची एक्सक्लुझिव्हिटी टिकवणे, हा त्यांच्या व्यवसायिक मूल्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूडमध्ये घडतंय तरी काय? ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चननंतर अजय देवगणची कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?


