आधी अश्लील Chat नंतर MMS leaked, अभिनेत्याच्या 'त्या' Videoमुळे सोशल मीडियावर चर्चा, चाहत्यांना बसला धक्का
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नेमकं प्रकरण काय आहे?अभिनेत्यावर काय आरोप झालेत? आणि त्या कथित MMS व्हिडिओचं सत्य काय? जाणून घ्या या रिपोर्टमध्ये.
मुंबई : एंटरटेनमेंट विश्वात 'विवादास्पद' चेहरा म्हणून ओळखला जाणारा एजाज खान (Ajaz Khan) पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडला आहे. 'बिग बॉस' फेम हा अभिनेता त्याच्या सिनेमापेक्षा वादांमुळेच जास्त चर्चेत असतो, पण यावेळी प्रकरण थेट त्याच्या चारित्र्यावर आणि सोशल मीडिया चॅट्सवर येऊन ठेपलं आहे. दिल्लीतील एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने एजाजला 'एक्सपोज' केल्याचा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे? एजाज खानवर काय आरोप झालेत? आणि त्या कथित MMS व्हिडिओचं सत्य काय? जाणून घ्या या रिपोर्टमध्ये.
1. 'फिट वर्षा'चे खळबळजनक स्क्रीनशॉट्स व्हायरल
दिल्लीतील लोकप्रिय फिटनेस इन्फ्लुएंसर 'फिट वर्षा' (Fit Varsha) हिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर काही चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. हे चॅट्स एजाज खानसोबत असल्याचा दावा तिने केला आहे. वर्षाने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलंय, "सध्या सगळेच एकमेकांना एक्सपोज करत आहेत, तर मग मी तरी मागे का राहू? मी सुद्धा एका बिग बॉस स्पर्धकाला एक्सपोज करायचं ठरवलंय."
advertisement
चॅट्समध्ये नेमकं काय आहे?
व्हायरल चॅट्सनुसार, एजाज खान वर्षाला मेसेज करून सांगतो की, "तू दिल्लीची आहेस आणि मी सुद्धा सध्या दिल्लीतच आहे." त्यानंतर तो स्वतःचा व्हॉट्सॲप नंबर तिला देतो. जेव्हा वर्षा विचारते की, "तू मला नंबर का देतोयस?", तेव्हा एजाज म्हणतो, "बोलण्यासाठी... आपण एकत्र काहीतरी करू शकतो." मात्र, वर्षाने याला अत्यंत जर्बदस्त उत्तर देत त्याला थेट 'Get Lost' असं म्हटलं आहे.
advertisement
2. कथित MMS व्हिडिओची एन्ट्री
चॅट्स व्हायरल होत असतानाच सोशल मीडियावर 'एजाज खान MMS' नावाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये एजाज एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
हा व्हिडिओ खरा की खोटा? सध्याच्या काळात 'AI' आणि 'Deepfake' तंत्रज्ञानाचा वापर करून कोणाचेही व्हिडिओ बनवले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की एजाजची प्रतिमा मलीन करण्यासाठी बनवलेला फेकमध्ये आहे, याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
advertisement
3. एजाज खानची प्रतिक्रिया काय?
या गंभीर आरोपांनंतर आणि चॅट्स व्हायरल झाल्यावर एजाज खानने अद्याप कोणतीही अधिकृत बाजू मांडलेली नाही. एरवी प्रत्येक विषयावर सोशल मीडियावर व्यक्त होणारा एजाज या प्रकरणावर गप्प का आहे? असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.
4. नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या प्रकरणावरून दोन गट पडले आहेत. काहींनी 'फिट वर्षा'च्या धाडसाचं कौतुक केलं आहे, तर काहींच्या मते जोपर्यंत एजाजची बाजू समोर येत नाही, तोपर्यंत कोणालाही दोषी ठरवणं चुकीचं आहे. एजाज खान याआधीही ड्रग्ज प्रकरण आणि इतर वादांमुळे जेलची हवा खाऊन आला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलच्या या बातमीने इंटरनेटवर मोठा गदारोळ माजवला आहे.
advertisement
एजाज खान खरंच इन्फ्लुएन्सर्सना अशा प्रकारचे मेसेज करतो का? की हे केवळ पब्लिसिटी स्टंट आहे? हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी हा 'कथित' MMS आणि व्हायरल चॅट्स एजाजची झोप उडवण्यासाठी पुरेसे ठरले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 8:50 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी अश्लील Chat नंतर MMS leaked, अभिनेत्याच्या 'त्या' Videoमुळे सोशल मीडियावर चर्चा, चाहत्यांना बसला धक्का










