Amitabh Bachchan : रेखाच्या 'या' गोष्टीने चढायचा अमिताभचा पारा; कारण ऐकून डोक्याला हात लावाल

Last Updated:

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला रेखाचा प्रचंड राग येत असे. त्यामुळे एकेकाळी अमिताभ आणि रेखा एकमेकांचा चेहराही पाहत नसे.

News18
News18
Amitabh Bachchan Rekha : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि एवरग्रीन अभिनेत्री रेखा एकेकाळी बॉलिवूडची सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी होती. दोघांच्या प्रेमाबद्दल अनेक चर्चा आहेत. अमिताभ आणि रेखा यांच्या रोमान्सबद्दलही अनेक अफवा पसरल्या आहेत. कामासंदर्भात मैत्री होण्याआधी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. जया बच्चनमुळे रेखा आणि अमिताभ यांच्यात दुरावा आला असल्याचं म्हटलं जात असलं तरी खरं कारण मात्र वेगळच आहे. अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला रेखाचा प्रचंड राग येत असे. त्यामुळे एकेकाळी अमिताभ आणि रेखा एकमेकांचा चेहराही पाहत नसे.
शूटिंगच्या वेळी शॉपिंगला जायची...
अमिताभ आणि रेखा एका चित्रपटाचं शूटिंग करत होते. मुलाखतीचं आयोजन असल्याने या चित्रपटाचं शूटिंग सकाळी 9 वाजता सुरू होणार होतं. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन 7 वाजता सेटवर पोहोचले होते. मेकअप आणि गेटअप करुन अमिताभ बच्चन 9 वाजेपर्यंत तयार झालेला असे. पण चित्रीकरणाची वेळ आली तरी रेखा सेटवर उपस्थित नसत. रेखा शूटिंगच्यावेळी कोलकाता येथे शॉपिंग करायला जात असे. शॉपिंगला गेलेल्या असल्याने रेखा तासनतास सेटवरुन गायब असे. शॉपिंगवरुन आल्यानंतर रेखा यांना आपले संवादही आठवत नसे.
advertisement
अमिताभ बच्चन आपल्या भूमिकेत पूर्णपणे तयार असे. सर्व संवाद त्यांचे पाठ असे. फक्त एक-दोन दिवस नव्हे तर अनेक दिवस अमिताभ यांना शॉपिंगच्या कारणाने रेखा यांनी त्रास दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक, निर्मात्यांकडे रेखा यांची तक्रारदेखील केली होती. अमिताभ यांना रेखा या अनप्रोफेशनल वाटत होत्या. दुसरीकडे निर्मात्यांनीही रेखा यांना पाठिंबा दिला. रेखा यांची आता ही सवय झाली असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे इंडस्ट्रीत वेळेची किंमत नाही आणि प्रोफेशनलिज्म कधीच येऊ शकत नाही याचा अंदाज अमिताभ बच्चन यांना आला.
advertisement
अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
अमिताभ बच्चन लवकरच 'सेक्शन 84','आँखे 2','द इन्टर्न' आणि 'ब्रह्मास्त्र -2' या चित्रपटात झळकणार आहेत. वयाच्या 80 व्या वर्षानंतरही अमिताभ बच्चन तेवढेच सक्रीय आहेत. आजही दिवसातले 12-12 तास ते चित्रीकरण करतात. सध्या 'कौन बनेगा करोडपती' या बहुचर्चित कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Amitabh Bachchan : रेखाच्या 'या' गोष्टीने चढायचा अमिताभचा पारा; कारण ऐकून डोक्याला हात लावाल
Next Article
advertisement
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement