ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना ३५ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले

Last Updated:

Thane News: उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावरील कारवाईच्या वृत्ताने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठाणे महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे (अतिक्रमण विभाग) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतले आहे. उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावरील कारवाईच्या वृत्ताने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी यापूर्वी अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजित कदम यांच्याकडून १० लाख रुपये स्वीकारले होते. बुधवारी त्यांना २५ लाख रुपये स्वीकारताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने रंगेहात पकडले आहे.
बुधवारी सायंकाळी ६:५० वाजता भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन तपास करीत आहेत. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी न्यूज १८ लोकमतला सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना ३५ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले
Next Article
advertisement
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement