महाराष्ट्राने नेता गमावला, कलाकारांनी रसिक श्रोता! अजित दादांसाठी शेवटचं गाणं अन्... अवधूत गुप्ते भावुक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर लिहिलेली भावुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याने एक निष्णात राजकारणी, धडाडीचा कार्यकर्ता आणि जाणता नेता गमावला आहे. मात्र या दुःखासोबतच मराठी कला-संस्कृती विश्वालाही मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर लिहिलेली भावुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अवधूत गुप्ते यांनी अजित पवारांसाठी आजपर्यंत अनेक गाणी केली. पालिका निवडणुकांसाठी अवधुत गुप्तेनं दादांसाठी केलेलं शेवटचं गाणं ठरलं. या गाण्याची आठवण अवधुत गुप्तेनं त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं. अवधुत म्हणाला, "अजितदादांचे देऊया नारे…” हे गीत महापालिका निवडणुकांच्या काळात त्यांनी अजित पवार यांच्यासाठी गायलेलं शेवटचं गीत ठरलं. या गाण्यानंतर अजित पवार यांचा फोन आला होता. त्या फोनवर त्यांनी अवधूत गुप्तेंचं भरभरून कौतुक केलं होतं. ते बोलणं शेवटचं ठरेल, याची तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती."
advertisement
अवधुत पुढे म्हणाला, "निवडणूक प्रचार गीते ही जरी अनुप्रयुक्त कलेचा भाग मानली जात असली, तरी ती तयार करणारे गायक-वादक हे कलाकारच असतात, असं अवधूत गुप्ते यांनी ठामपणे म्हटलं आहे. कलाकाराला जगण्यासाठी सर्वात आधी लागते ती 'दाद'. ही गोष्ट अजित पवार यांना चांगलीच ठाऊक होती. म्हणूनच 'मी राष्ट्रवादी-मी महाराष्ट्रवादी', 'राष्ट्रवादी लयभारी', 'अजिंक्य भगिनी अजित भगिनी' यांसारख्या अनेक गाण्यांना तुम्ही भरभरून दाद दिली.
advertisement
advertisement
अवधुतने पोस्टच्या शेवटी लिहिलंय, "आज महाराष्ट्राने एक निष्णात राजकारणी, एक धडाडीचा कार्यकर्ता, एक जाणता नेता, एक लाडका भाऊ.. गमावला आहे. पण त्याचबरोबर आमच्यासारख्या कलाकारांनी एक रसिक श्रोता आणि एक दिलदार आश्रयदाता गमावला आहे हे नक्की! दादा.. जिथे जाताय तिथे सुखी रहा.. ह्याच शुभेच्छा.. हीच श्रद्धांजली."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 10:17 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
महाराष्ट्राने नेता गमावला, कलाकारांनी रसिक श्रोता! अजित दादांसाठी शेवटचं गाणं अन्... अवधूत गुप्ते भावुक








