Bigg Boss 19 : 'पुढच्या वेळेस कपडे घालून ये...' हे काय बोलून गेली मालती चहर; 'बिग बॉस'ने थेट राशनच बंद केलं

Last Updated:

Bigg Boss 19 Latest Update : ‘बिग बॉस 19’ मध्ये 15 ऑक्टोबरला जोरदार गोंधळ पाहायला मिळणार आहे. मालतीने नेहलच्या कपड्यांवर एक घाणेरडी कमेंट केली आहे. मालतीच्या या चुकीच्या वागणुकीची शिक्षा 'बिग बॉस'ने घरातील इतर सदस्यांना दिली आहे. मालतीच्या चुकीमुळे घरचं राशन कमी करतात.

News18
News18
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'च्या घरात मालती चाहरने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यापासून घरात खूप वाद निर्माण झाले आहेत. आतापर्यंत तिचं फार कमी लोकांशी मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे. घरातील अनेक मंडळींसोबत मात्र ती वाद घालतानाच दिसून येत आहे. फरहाना, नेहल आणि तान्याशी तर तिचं अजिबात जमत नाही. हे प्रत्येक एपिसोडमध्ये दिसून येतं. आगामी एपिसोडमध्ये मालती आणि नेहलमध्ये शिरा बनवण्यावरुन वाद निर्माण होतो आणि त्यामुळे घरातील वातावरण तापतं. मालतीच्या एका चुकीची शिक्षा घरातील सर्व सदस्यांना मिळते. बिग बॉस घरातील राक्षनमधील 11 गोष्टी रद्द करतात. मालती नेहलच्या कपड्यांवर कमेंट करते. त्यामुळे मालतीविरोधात घरातील सर्व सदस्य उभे ठाकतात. 15 ऑक्टोबरच्या 'बिग बॉस 19'च्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हे पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी या भागाचा प्रोमो आऊट केला आहे.
'बिग बॉस'ने दिली घरातील सर्व सदस्यांना शिक्षा
'बिग बॉस'च्या आगामी भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"मालतीने आपल्या टेडी बियरसंबंधी हलगर्जीपणा दाखवला. तिने तो जमिनीवर फेकून दिला. त्यामुळे मी 9 नाही तर 11 राशन कमी करतोय.” हे ऐकून घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसतो. सर्व सदस्य मालतीला सुनवायला सुरुवात करतात. मालती म्हणते,"इतकी मोठी समस्या करण्याची गरज नाही, चुकलं तर चुकलं. मी माफी मागते.”
advertisement
मालतीने केली नेहलच्या कपड्यांवर कमेंट
मालती सॉरी बोलल्याने नेहल एक टोमणा मारते त्यामुळे मालती पुन्हा भडकते. नेहल मालतीला "बेवकूफ औरत" म्हणते. एकदा नेहल किचनमध्ये काही बोलत असताना, मालती मध्येच बोलते. तेव्हा नेहल तिला म्हणते, "मालती चाहर, मी तुझ्याशी बोलत नाही आणि मला तुझ्याशी काहीच घेणं-देणं नाही." यावर मालती उत्तर देते – 'नेक्स्ट टाइम कपडे घालून बोल माझ्याशी.'
advertisement
बसीर आणि कुनिका मालतीवर भडकले
मालतीचं बोलणं ऐकताच बसीर, कुनिका आणि इतर घरचे सदस्य संतापतात. बसीर चिडून म्हणतो, "मुख्य दरवाजा उघडवतो, तू इथून बाहेर निघून जा. तू काय वेडी आहेस का? मुर्खांच्या बाजारातून आली आहेस का? समजत नसेल तर समजावलं जाईल." त्यावर मालती बसीरला म्हणते, "तू मुलींच्या वादात मध्ये येऊ नकोस." यावर बसीर उत्तर देतो,"मग तू शोमधून बाहेर निघून जा." पुढे नेहल किचनमध्ये सर्वांना सांगते की "शिरा बनवतोय आणि कोणी त्यात हस्तक्षेप करणार नाही." मालती यावर हसून म्हणते – "वाईट शिरा बनेल." हे ऐकून बसीर चिडतो आणि म्हणतो,"तू काय बोलते आहेस, हे तरी कळतंय का तुला?" या संपूर्ण प्रकरणामुळे घरात मोठा वाद निर्माण होतो. आता 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खान या प्रकरणावर काय घरातील सदस्यांची कशापद्धतीने शाळा घेतोय हे पाहणं रंजक ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 : 'पुढच्या वेळेस कपडे घालून ये...' हे काय बोलून गेली मालती चहर; 'बिग बॉस'ने थेट राशनच बंद केलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement