'BIGG BOSS'च्या घराचा A-Z खर्च किती? आकडा ऐकून बसेल धक्का

Last Updated:

Bigg Boss House Cost : 'बिग बॉस'च्या घराची निर्मिती दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार केली जाते. दरवर्षी घरी तोडायला आणि पुन्हा ते बांधायला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.

News18
News18
Bigg Boss House : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. परदेशातील कल्पना असलेल्या या कार्यक्रमाने भारतात चांगलीच पकड घेतली. भारतात वेगवेगळ्या भाषेत या कार्यक्रमाचं प्रसारण होतं. तर ओटीटीसाठीदेखील एका वेगळ्या 'बिग बॉस ओटीटी'चं आयोजन केलं जातं. पण या प्रत्येक सीझनमधील स्पर्धकांसोबत चर्चेत येतं ते म्हणजे 'बिग बॉसचं घर'. या आलिशान घराची किंमत किती? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
advertisement
'बिग बॉस'च्या घराला प्रत्येक वेळी पाडून पुन्हा तयार करण्यात किती खर्च येतो, याबाबत सार्वजनिकरीत्या कधीही उघडपणे सांगितले जात नाही. मात्र, प्रत्येक सीझनसाठी हे घर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो, ज्याची अंदाजे किंमत कोट्यवधी रुपये असते.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस'च्या घराचे पाडणे आणि पुन्हा बांधणे यावर सुमारे 3 कोटी ते 3.5 कोटी रुपये इतका खर्च येतो. हा खर्च फक्त बांधकामासाठी नाही. यामध्ये घराची डिझाइन, दरवर्षी बदलणारा सेट,
सिक्युरिटी आणि शोसाठी लागणाऱ्या सपोर्ट स्टाफचा खर्च यांचाही समावेश आहे. हे घर बांधण्याच्या प्रक्रियेत सुमारे 500 ते 600 कामगार जवळपास सहा महिने काम करतात.
advertisement
प्रत्येक वर्षी घर तयार करण्याच्या खर्चात बदल होतो. कारण प्रत्येक सीझन हा मागील सीझनपेक्षा वेगळा असतो. घराला त्याच्या थीमनुसार रूप दिलं जातं. आर्ट डायरेक्टर्स या घराचं भव्य इंटीरियर डिझाईन करतात, आणि त्याच्या सौंदर्यावर मोठा खर्च केला जातो. घरातील तंत्रज्ञान आणि सुरक्षा हे एक महत्त्वाचं मुद्दे आहेत. घरात सतत देखरेख ठेवण्यासाठी अनेक कॅमेरे लावले जातात. एडिटिंग आणि संहितेसाठीही विशेष स्टाफ लागतो. घराच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर सपोर्ट स्टाफची गरज भासते. बांधकामात शेकडो कामगार सहभागी असतात, तर शोच्या संचालनासाठीही एक मोठी टीम आवश्यक असते. लॉजिस्टिक्स आणि देखभाल यावरसुद्धा अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो. सेट कायम ठेवणे आणि स्पर्धकांचे व्यवस्थापन करण्यासाठीही मोठा खर्च केला जातो.
advertisement
कॅमेऱ्यावर होतो सर्वाधिक खर्च
दैनिक भास्करच्या एका रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरात लावलेले कॅमेरे भाड्याने घेतलेले असतात. शो संपल्यानंतर सर्वात आधी हे कॅमेरे काढले जातात, कारण त्यांची किंमत खूप जास्त असते आणि ते पुढच्या सीझनसाठी पुन्हा वापरले जातात. सुमारे 120 कॅमेरे भाड्याने घेतलेले असतात, जे सर्वात आधी हटवले जातात.
advertisement
'या' गोष्टी जातात गोदामात
फ्रिज, ओव्हन, आरओ मशीन, गॅस स्टोव्ह आणि भांडी या स्वयंपाकघरातील सर्व वस्तू शो संपल्यानंतर गोदामात पाठवल्या जातात. एकदा वापरलेल्या या गोष्टी पुन्हा वापरल्या जात नाहीत. सलमान खान जे टीव्हीच्या माध्यमातून स्पर्धकांशी संवाद साधतात, तो टीव्हीही शो संपल्यानंतर गोदामात ठेवला जातो. बिग बॉसचे बिछाने (बेड) प्रत्येक सिझनमध्ये बदलले जातात. प्रत्येक वेळी स्पर्धकांसाठी नवीन गाद्या आणि पलंग तयार केले जातात. कारीगर सेटवर येऊन पुन्हा नवीन बेड तयार करतात. जुने बेड पुन्हा वापरले जात नाहीत.
advertisement
मराठी बातम्या/मनोरंजन/
'BIGG BOSS'च्या घराचा A-Z खर्च किती? आकडा ऐकून बसेल धक्का
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement