Indore Manmad Railway: मुंबई ते इंदूर प्रवासात तब्बल 5 तासांची बचत होणार! कोणत्या जिल्ह्यांना मिळणार फायदा?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Indore Manmad Railway: एकूण 309 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा 138.44 किलोमीटर भाग हा महाराष्ट्रात असणार आहे.
मुंबई: राज्यामधील रेल्वे जाळं अतिशय वेगाने विस्तारत आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी सुधारावी यासाठी अनेक नवीन रेल्वे मार्गांचा पाया घातला जात आहे. यामध्ये इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाचाही समावेश होतो. हा मध्य प्रदेशातील इंदूर या शहराला महाराष्ट्रातील मनमाडशी जोडणारा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची लांबी सुमारे 309 किलोमीटर आहे. या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर ते मनमान रेल्वे मार्गासाठी कित्येक दिवसांपासून भूसंपादन प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया आता ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील एकूण जिल्ह्यांमधून जाणार आहे. या मार्गामुळे इंदूर आणि मुंबईमधील प्रवासाचं सुमारे 300 किलोमीटर अंतर कमी होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 5 तासांनी कमी होणार आहे.
advertisement
एकूण 309 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा 138.44 किलोमीटर भाग हा महाराष्ट्रात असणार आहे. मनमाडपासून मालेगाव धुळेमार्गे हा रेल्वे मार्ग इंदूरपर्यंत जाणार आहे. यासाठी केंद्र सरकराने 16 हजार 320 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मार्गामुळे 1 हजार गावं आणि 30 लाख नागरिकांना फायदा होणार आहे. औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला फायदा होणार असून अनेक आदिवासी भागांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
advertisement
सध्या मुंबईहून मध्य प्रदेशातील इंदूर येथे जाण्यासाठी गुजरातमार्गे जावं लागते. मुंबई आणि इंदूर ही दोन महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे आहेत. इंदूर-मनमाड रेल्वे मार्गामुळे या दोन्ही शहरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या रेल्वे मार्गात 30 नवीन स्टेशन्स बांधली जाणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 10:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indore Manmad Railway: मुंबई ते इंदूर प्रवासात तब्बल 5 तासांची बचत होणार! कोणत्या जिल्ह्यांना मिळणार फायदा?