advertisement

Rakhi Sawant : स्क्रिप्टेड ड्रामावरून भाऊने सुनवलं! Bigg Bossच्या घरात राखी सावंतचा Real Drama सुरू

Last Updated:

बिग बॉसच्या घरात अभिनेत्री राखी सावंतचा हाय व्होल्टेड ड्रामा सुरू झाला. स्क्रिप्टेड ड्रामावरून भाऊच्या धक्क्यावर तिची शाळा घेण्यात आली होती.

News18
News18
Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वात पुन्हा एकदा घरात मोठा वाद रंगताना दिसणार आहे. शोचा लेटेस्ट प्रोमो समोर आला असून त्यामध्ये राखी आणि सागर यांच्यात जोरदार भांडण होताना दिसत आहे. गेली काही आठवडे राखी बिग बॉसच्या घरात स्क्रिप्टेड ड्रामा करते असं दिसलं होतं. ज्यावरून तिला भाऊच्या धक्क्यावर चांगलंच सुनावलं गेलं होतं. त्यानंतर राखी आता रिअल ड्रामा करताना दिसणार आहे.
प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, घरात किचनमध्ये काम सुरू असताना राखी जेवण बनवण्यासाठी जाते. त्याच वेळी घरातील कोणीतरी तिला चहा बनवायला सांगतं. मात्र यावर राखी संतापते आणि सांगते की, "आता मी जेवण बनवते आहे, चहा नाही होणार." यानंतर तिचा आवाज चढतो आणि ती आरडाओरडा करू लागते.
advertisement
राखीचा हा संताप पाहून सागरही चिडतो. तो तिला म्हणतो, "ए, उगाच ओरडू नको." यावरून दोघांमध्ये वाद आणखी चिघळतो. संतापलेल्या राखीचा राग इतका वाढतो की ती गॅसवर ठेवलेला जेवणाचा टोप उचलते आणि थेट बेसिनमध्ये फेकून देते. राखीची ही कृती पाहून घरातील सदस्यही थक्क होतात. त्यावेळी संस्कृती मोठ्याने ओरडताना दिसते.
यानंतर राखी आणि सागर यांच्यातील भांडण आणखी तीव्र होतं. संतापलेल्या राखी सागरला उद्देशून म्हणते, "तू मला शक्ती दाखवतोस, मुडद्या." यावर सागरही मागे हटत नाही. तो म्हणतो, "तुझं काय आहे?" प्रोमोमध्ये पुढे दिसतं की, सागर राखीकडे हात पुढे करतो पण राखी त्याचा हात धुडकावून लावते. यामुळे सागरचा राग अनावर होतो. तो मोठ्याने ओरडत म्हणतो, "हात नाय लावायचा."
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
घरातील वातावरण अधिक तणावपूर्ण होतं आणि राखी थेट सागरच्या अंगावर धावून जाते. घरातील इतर सदस्य तत्काळ मध्ये पडतात. राकेश आणि इतर स्पर्धक राखीला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र सागरही संतापलेला दिसतो. तो वारंवार "ये, ये" असं म्हणत तिला चॅलेंज देताना दिसतो.
या संपूर्ण प्रकारामुळे घरातील वातावरण एकदम तापलेलं दिसत आहे. राखीच्या या कृतीनंतर पुढे काय घडणार, घरातील सदस्य यावर कशी प्रतिक्रिया देणार आणि या भांडणाचा खेळावर काय परिणाम होणार, हे पाहण आजच्या भागात इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rakhi Sawant : स्क्रिप्टेड ड्रामावरून भाऊने सुनवलं! Bigg Bossच्या घरात राखी सावंतचा Real Drama सुरू
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement