'मी जातोय 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये', कोण आहे हा? VIDEO होतोय व्हायरल

Last Updated:

Bigg Boss Marathi Season 6 : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात सहभागी होणाऱ्या एका स्पर्धकाने व्हिडीओ शेअर करत स्वत:च तो सहभागी होत असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

News18
News18
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाची लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या सीझनप्रमाणे या सीझनमध्येही महाराष्ट्राचा लाडका भाऊ अर्थात सुपरस्टार रितेश देशमुख होस्ट करताना दिसणार आहे. 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्याची अनेकांची इच्छा असते. दरम्यान या सीझनमध्ये कोण-कोण स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. सोशल मीडियावर एका लोकप्रिय रिलस्टारने तर थेट व्हिडीओ शेअर करत तो या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच जास्तीत जास्त वोट्स करण्याचं आवाहनदेखील त्याने चाहत्यांना केलं आहे. त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच पाठिंबा देणार असल्याचंही म्हणत आहेत. त्यामुळे आता हा स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात आपला खेळ कसा खेळणार हे जाणून घेण्यास 'बिग बॉस'प्रेमी आता उत्सुक आहेत.
'बिग बॉस मराठी'मध्ये कोण होणार सहभागी?
अभिजीत मोरे या रिलस्टारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय,"रितेश भाऊंनी 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनची घोषणा केली आहे. लवकरच आपला 'मराठी बिग बॉस' चालू होणार आहे. याच 'बिग बॉस'बद्दल मला तुम्हाला एक गुडन्यूज द्यायची आहे. खूप दिवसांपासून हे सिक्रेट होतं. पण आता मी तुम्हाला सांगू शकतो. कारण आता या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा झाली आहे. होय मी जातोय 'बिग बॉस मराठी सीझन 6'मध्ये. मी तुम्हाला अजिबात खोटं सांगत नाही. जेव्हा इंस्टा, युट्यूबचा प्रवास सुरू केला होता तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की मला 'बिग बॉस' सारख्या प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्याची संधी मिळेल. हे सगळं शक्य झालं आहे त्याचं कारण तुम्ही आहात. तुम्ही मला स्टार्ट टू एन्डं खूप सपोर्ट केला आहे. एवढं प्रेम दिलं त्यासाठी खरंच धन्यवाद. पण आधी मला थोडी भीती वाटत होती".
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Abhijit Suresh More (@jhingat_sunnya)



advertisement
अभिजीत पुढे म्हणाला,"पण तुम्ही सर्वांनी कमेंट्समध्ये एवढा सपोर्ट केला. कितीकरी वेळा मला बोललात की 'बिग बॉस'मध्ये तू जायला हवं. म्हणून मग मी म्हटलं की चला एकदा प्रयत्न करुन पाहू. मी येतोय जर्मनीवरुन भारतात फक्त आपल्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये सहभाही होण्यासाठी. पण आता आपल्याला दुप्पट मेहनत करायची आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात गेल्यानंतर तुमच्या वोट्सची मला खरंच गरज लागेल. तुमचं एक वोट मला 'बिग बॉस'च्या प्रवासात खूप पुढे घेऊन जाईल. तुमचं वोट मी वाया जाऊ देणार नाही हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. तुमचं मी फुल ऑन मनोरंजन करेल. याची खात्री देतो. जसं 'बाहुबली'मध्ये त्याची आई बोलते ना 'मेरा वचन ही है शासन' तसंच मीपण तुम्हाला वचन देतो 'मेरा वचन ही है शासन'.
advertisement
अभिजीत पुढे झोपेतून उठतो आणि हे सगळं स्वप्न असल्याचं त्याच्या आणि चाहत्यांच्या लक्षात येतं. त्यानंतर अभिजीत पुढे म्हणतो,"जाऊद्या. बिग बॉस मध्ये जे आहेत त्यांना तरी पाठिंबा द्या". अभिजीत मोरे 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार असल्याने त्याचे चाहते आनंदी झाले होते. पण आता हे त्याचं स्वप्न असल्याने चाहते नाराज झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी जातोय 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये', कोण आहे हा? VIDEO होतोय व्हायरल
Next Article
advertisement
Maharashtra Local Body Election: जिल्हा परिषद निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट समोर
ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट
  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

View All
advertisement