बॉलिवूड अभिनेत्रीच्या आयुष्यात दुहेरी संकट! एकीकडे भाऊ 444 दिवसांपासून तुरुंगात, दुसरीकडे पतीकडून छळ
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाऊ गेल्या 444 दिवसांपासून UAE च्या तुरुंगात आहे. अशातच आता अभिनेत्रीचा फॉरेनर पतीकडून छळ होत असल्याचं समोर आलं आहे.
45अभिनेत्री आणि मिस इंडिया जिंकणारी सेलिना जेटली गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. सेलिनाचा भाऊ मेजर विक्रांत कुमार जेटली गेल्या 444 दिवसांपासून UAE च्या तुरुंगात आहे.
अभिनेत्रीने आपल्या भावाच्या सुटकेसाठी दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत आणि सातत्याने पोस्ट्सद्वारे भावाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत आहे. नुकतंच तिने पोस्ट शेअर करत भावाला परदेशात किडनॅप होऊन 444 दिवस झाले असल्याची माहिती दिली होती. पोस्ट शेअर करत तिने आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. अशातच अभिनेत्रीचा फॉरेनर पतीकडून छळ होत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने याबद्दल पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 50 कोटी रुपयांची भरपाई तिने मागितली आहे. सेलिना जेटली दुहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे भाऊ 444 दिवसांपासून तुरुंगात असताना दुसरीकडे पतीकडून छळ होत आहे.
advertisement
भावामुळे सेलिना चिंतेत
सेलिनाने आपल्या भावासोबतचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे की,"सुद्ध के मैदान से सलाखों तक, एका भारतीय सैनिकाचे दु:ख, माझ्या भावाशिवाय 444 दिवस. माझा भाऊ मेजर विक्रांत कुमार जेटली (निवृत्त) 1 वर्ष, 2 महिने, 17 दिवस , एकूण 443 दिवस झाले आहेत. पहिल्यांदा अपहरण झाल्यापासून आठ महिने त्याच्यासोबत कोणताही संपर्क झालेला नाही. त्याला मिडिल ईस्टमध्ये कुठेतरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून मला खूप भीती वाटत आहे. माझ्या आयुष्यात भीती, आशा आणि एक शांतता आली आहे. मला भीती वाटते की त्यांच्या सोबत काय केले गेले असेल. मला भीती आहे कारण त्या शेवटच्या कॉलमध्ये त्यांनी काय सांगितले होते ते मला आठवतंय. एक असा कॉल ज्यात शब्दांपेक्षा जास्त वेदना होत्या, एक असा आवाज ज्यात जगासमोर न आलेली सत्यता दडलेली होती."
advertisement
भावासोबतचा 'तो' शेवटचा कॉल
सेलिना जेटलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की शेवटच्या वेळी जेव्हा ती आपल्या भावाशी बोलली, तेव्हा त्याच्या आवाजात खूप वेदना होत्या आणि त्याचा तो आवाज आजही तिच्या कानात गुंजत राहतो. सेलिना जेटलीने लिहिलं आहे,"माझ्याकडे उत्तरांपेक्षा प्रश्न जास्त आहेत. प्रत्येक क्षणात भीती आहे. मेजर विक्रांत जेटली यांनी आपल्या संपूर्ण तरुणपणात देशाची सेवा केली. आपल्या कर्तव्यात ते अनेकदा जखमीही झाले. आता भारत विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर असताना, आपल्या निवृत्त सैनिकांना विदेशात लक्ष्य केले जात आहे. हे आता फक्त वैयक्तिक उरलेले नाही. आपल्या सैनिकांना आणि माजी सैनिकांना विदेशात उचलून नेण्याची ही सुरू झालेली पद्धत काय आहे? आपल्या राष्ट्रीय सुरक्षेलाही ही पद्धत धोका निर्माण करत नाही? आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत. आपण उत्तरांची मागणी केली पाहिजे. आपण दुर्लक्ष करू नये".
advertisement
सुरक्षा कारणास्तव विक्रांतना ताब्यात घेण्यात आले
view commentsसेलिनाने काही दिवसांपूर्वी कोर्टात माहिती दिली होती की तिचा भाऊ विक्रांत 2016 पासून UAE मध्ये राहत होता आणि 2024 मध्ये त्याला राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत ताब्यात घेण्यात आले. सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की UAE मध्ये विक्रांतला योग्य कायदेशीर प्रतिनिधित्व उपलब्ध करून द्यावे. अभिनेत्रीने आपल्या याचिकेत UAE मध्ये भावासाठी कायदेशीर प्रतिनिधी नेमण्याची मागणीही केली होती. पण आता अभिनेत्रीचा पतीकडून छळ होत आहे. त्यामुळे अभिनेत्री दुहेरी संकटात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 4:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूड अभिनेत्रीच्या आयुष्यात दुहेरी संकट! एकीकडे भाऊ 444 दिवसांपासून तुरुंगात, दुसरीकडे पतीकडून छळ


