मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चनला पुरून उरला, हा अभिनेता आता जगतोय साधं आयुष्य

Last Updated:

Amitabh-Movies हा अभिनेता आता जगत आहे साधं आयुष्य !! असे सिनेसृष्टीत खूप अभिनेते आहेत. जे आपले अस्तित्व जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये टिकवू शकले नाहीत. बच्चन कुटुंबासोबत आहेत चांगले संबंध.

News18
News18
Deepak Pareshar : सिनेसृष्टीत असे खूप अभिनेते येतात आणि सुपरहिट सिनेमे देतात. एवढे हिट सिनेमे देऊनही लोकांच्या लक्षात राहत नाहीत. असे सिनेसृष्टीत खूप अभिनेते आहेत. जे आपले अस्तित्व जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये टिकवू शकले नाहीत. त्यामुळे ते अगदी साधे जीवन जगत आहेत. या अभिनेत्याची तुलना चक्क महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत व्हायची. या दोन अभिनेत्यांमध्ये कोल्ड वॅार होते असे म्हटले जाते. पण अमिताभ बच्चन हे महानायक झाले. हा अभिनेता काळाच्या ओघात करीयर संपवून बसला. कोण हा अभिनेता जाणून घेऊ.

कोण आहे हा अभिनेता ?

या अभिनेत्याचे नाव आहे दीपक परेशार. ते 'निकाह' सिनेमातुन घराघरात पोहचले होते. त्यांना 1980  दशकाच्या  बी.आर.चोपडा यांच्या कामापासून ओळखले जाते. दीपक यांचे म्हणणे असे होते की, अमिताभना थोडे असुरक्षित जाणवायचे, कारण त्यावेळी त्यांनी सगळ्या अभिनेत्रींसोबत काम केले होते. दीपक यांनी अमिताभ यांच्याशी शराबी सिनेमात काम करतानाचा किस्सा सांगताना म्हणाले , " या स्टारला त्यांची मैत्रीण राखी यांच्या फिल्ममध्ये डिमोशन करण्यामागे कोणाचा तरी हात होता.
advertisement

मी इंडस्ट्री मध्ये आलो ...

त्यांनी सांगितले की, " मीडीयानेच हे पसरवले होते की, अमिताब बच्चन बाजूला व्हा , दीपक पराशर आले आहेत. मी मिस्टर अमिताभ यांच्या सगळ्या लीड अभिनेत्रींसोबत काम केले होते. आणि त्यामुळे कदाचित त्यांना असे लिहायची प्रेरणा मिळाली असेल. मी एका इवेंटमध्ये त्यांना जे काही होते, ते सर्व समजावून सांगितले होते, त्यानंतरच शराबी मध्ये आम्ही एकत्र काम केले होते. जेव्हा मी इंडस्ट्री मध्ये आलो त्याअगोदरच मी एक स्टार होतो. त्यामुळे थोडी जलन होणे स्वाभाविकच आहे. पण मला काहीच समजत नव्हते , त्यांना काय विचलीत करत होते, हिच खेदाची भावना आहे. लोकांना वाटते की,तो एक सामान्य आहे. मी मिस्टर बच्चन यांच्याविषयी बोलत नाहीये."
advertisement

कुटुंबासोबत चांगलं नाते

पुढे अभिनेते दीपक म्हणाले , " एका सिनेमात माझ्याऐवजी बच्चन यांना घेतले गेले. त्यामुळे अजुनच विषय चिघळला. सुरुवातीला मला सांगितले गेलं की, हा कमी बजेट सिनेमा आहे. आणि जास्त पैसे आल्यावर अमिताभ यांनाच घेण्यात आले. त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. असे खूप अभिनेते आहेत जे बच्चन यांच्यापेक्षा चांगले आहेत. माझे जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याशी चांगले संबंध आहेत. "
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चनला पुरून उरला, हा अभिनेता आता जगतोय साधं आयुष्य
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement