Damini 2.O : सत्यता शोधण्या... 'दामिनी' येण्याची वेळ झाली, मुख्य भूमिकेत प्रतीक्षा लोणकर नाही, मग ती कोण!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Damini 2.O : दामिनी ही दूरदर्शन सह्याद्रीवरील ऐतिहासिक दामिनी ही मालिका 30 वर्षांनी नव्या कलाकारांसह परत येतेय. मालिकेत प्रमुख भूमिकेत प्रतिक्षा लोणकर ऐवजी नवी अभिनेत्री दिसणार आहे.
'सत्यता शोधण्या, घेऊनी लेखणी, जाहली दामिनी, मूर्त सौदामिनी... हे गाणं आजही कानावर पडलं की दामिनीची आठवण येते. हीच दामिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पाच वर्ष 1500 एपिसोड्स करणारी ही दूरदर्शन सह्याद्रीवरची पहिली दैनंदिन मालिका होती. या मालिकेला अनेक गुणी कलाकार, तंत्रज्ञांचा सहभाग आणि… प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं.
'दामिनी' ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली, तेव्हा तिने एक इतिहास घडवला. प्रतीक्षा लोणकर, क्षिती जोग या अभिनेत्रींनी आधी या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या. सुबोध भावे आणि क्षिती जोग यांची या मालिकेतील जोडीही गाजली. आता तीस वर्षांनी, या मालिकेचा दुसरा सीझन नव्या रूपात, नव्या दिमाखात पुन्हा त्याच वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दामिनी 2 मध्ये किरण पावसे ही साताऱ्याची अभिनेत्री मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिच्यासह पुण्याचा ध्रुव दातार हा अभिनेता नायकाच्या भूमिकेत आहे.
advertisement
येत्या 13 ऑक्टोबरपासून सायं 7.30 वा. 'दामिनी 2.O'.ही मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे. ही दामिनी आता नव्या रूपात, नव्या उत्साहात दाखल होणार असली, तरी तिची प्रेरणा, ऊर्जा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द तीच आहे. आपल्या आजीचा वारसा घेऊनच ही दामिनीही पत्रकारितेच्या नव्या क्षेत्रात लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये प्रतीक्षा लोणकर म्हणजेच दामिनीच्या फोटोला हार घातलेल्या दाखवला आहे. आजीच्या नावावरूनच नातीचं नावही दामिनीच ठेवण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
ध्रुव दातार हा अभिनेता या मालिकेतून नायकाच्या भूमिकेत झळकत आहे. नव्या दमाच्या कलाकारांबरोबरच आधीच्या दामिनी मालिकेतील सुबोध भावे आणि क्षिती जोग, हे कलाकारही या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आधीच्या मालिकेवर प्रेक्षकांनी जसं प्रेम केलं, तसंच या मालिकेवरही करतील, असा विश्वास सगळ्यांना आहे.
मूळ संकल्पना स्व. गौतम अधिकारी, मार्कंड अधिकारी यांची आहे. कांचन अधिकारी यांनी कथा, पटकथा लेखन आणि मालिका दिग्दर्शन केले आहे. विठ्ठल डाकवे हे एपिसोड दिग्दर्शक आहेत. कथाविस्तार आणि संवादलेखन अभिजित पेंढारकर यांचे आहे. मुंबई दूरदर्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 2:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Damini 2.O : सत्यता शोधण्या... 'दामिनी' येण्याची वेळ झाली, मुख्य भूमिकेत प्रतीक्षा लोणकर नाही, मग ती कोण!