धर्मेंद्रंनी फिल्मी स्टाइलनं मोडलं होतं हेमा मालिनीचं लग्न, होणाऱ्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पोहचले होते लग्नमंडपात
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Iconic Love Story: धर्मेंद्र आणि हेमाचे प्रेमप्रकरण फिल्मीस्टाइल होते, धर्मेंद्रनी हेमाचे लग्न मंडपातच मोडले होते. धर्मेंद्रनी सोबत जाताना, नवऱ्याच्या मैत्रीणीलाच मंडपात घेऊन गेले होते.
बॅालिवूड मधील अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लव स्टोरी बॅालिवूड मध्ये सगळ्यात चर्चित लव स्टोरी मध्ये समजली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, हेमा मालिनी यांचे लग्न हे धर्मेंद्र यांच्या ऐवजी जितेंद्र यांच्याशी होणार होते. कुटूंबाशी बोलून त्यांनी तयारीही केली होती. तेव्हा धर्मेंद्र यांनी फिल्मीस्टाइलने इंट्री केली. अचानक काही वर्षांनी हेमा यांचे लग्न धर्मेंद्र यांच्याशी झाले.
हेमा धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करत होत्या
हेमा त्यावेळीही धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करत होत्या. पण धर्मेंद्र यांचे अगोदरच लग्न झाले होते. पहिले लग्न धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर हिच्याशी झाले होती. 1954 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर 1980 मध्ये हेमा यांच्याशी धर्मेंद्र यांचे लग्न झाले. किस्सा असा आहे की शेवटच्या क्षणी जितेंद्र यांच्याशी लग्न मोडून हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले. या लव स्टोरीला एक 'आइकॅानिक लव स्टोरी' म्हटले जाते.
advertisement
जितेंद्र यांच्यासोबत ठरले होते लग्न
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झालेले असल्यामुळे हेमा यांच्या आईचा धर्मेंद्र यांच्या सोबतच्या लग्नाला नकार होता. त्यामुळे जितेंद्र यांच्यासोबत हेमाचे लग्न चेन्नइ मध्ये ठरले होते. धर्मेंद्रना हेमा मालिनीच्या लग्नाविषयी समजल्यावर, ते लगेच जितेंद्र यांच्या मैत्रीणीलाही सोबत घेऊन चेन्नइला पोहोचले. तिथे मंडपात जाऊन हेमा मालिनीला विनंती केली की," माझे प्रेम आहे तुझ्यावर त्यामुळे हे लग्न करु नकोस."
advertisement
कुटूंब रागाने गेले होते
view commentsहेमाने लग्नाला नकार दिला आणि हेमाची व जितेंद्र यांचे कुटूंब रागाने घरी निघून गेले होते. त्यामुळे त्यांचे हे लग्न खूप चर्चेत आले होते. बॅालिवूडमध्ये यांच्या लग्नाला एक वेगळाच दर्जा होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 9:08 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
धर्मेंद्रंनी फिल्मी स्टाइलनं मोडलं होतं हेमा मालिनीचं लग्न, होणाऱ्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पोहचले होते लग्नमंडपात


