बहिणीची Insta Post, संत प्रेमानंदचं नाव; दिशा पटानी घराची 'फायरिंग स्टोरी', CCTV VIDEO आला समोर

Last Updated:

Disha Patani House Firing Case : दिशाच्या घरावर गोळीबार करणाऱ्याच्या सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. इतकंच नाही तर हा हल्ला का झाला आणि कोणी केला याचीही माहिती समोर आली आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या घरावर गोळीबार होणं, त्यांना धमक्या मिळणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. गेली अनेक वर्ष अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. काही दिवसांआधी अभिनेता कपिल शर्माला देखील धमकी देत त्याच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबाराची घटना घडली आहे. दिशाच्या घरावर गोळीबार करणाऱ्याच्या सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. इतकंच नाही तर हा हल्ला का झाला आणि कोणी केला याचीही माहिती समोर आली आहे.
12 सप्टेंबर शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता बरेली येथील दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यावेळी तिचे आई-वडील आणि मोठी बहीण खुशबू पटानी घरात होते. घराबाबेर बाहेर 2 राउंड गोळीबार झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
advertisement

हल्लेखोरांचा सीसीटीव्ही व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, 2 दरोडेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. ते दिल्ली-लखनौ महामार्गावरून आले होते आणि घटना घडवून 7-8 मिनिटांत शहर सोडून गेले. पोलीस सध्या अभिनेत्रीच्या घरापासून महामार्गापर्यंतच्या CCTV फुटेजची तपासणी करत आहेत.

आधी झाली होती घराची रेकी

तपासात असेही समोर आले आहे की गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांनी दिशा पटानीच्या घराची रेकी केली होती. या घटनेत 2/3 गोळ्या झाडल्या गेल्या असून पोलिसांना 7 राउंड गोळीबार झाल्याचा संशय आहे.
advertisement

पोलिसांचे अधिकृत निवेदन

बरेली पोलिसांचे SP अनुराग आर्य यांनी या घटनेवर निवेदन दिले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर एक व्हिडिओ शेअर करत घटना गंभीर असल्याचे सांगितले.
advertisement

खुशबू पटानीच्या वादग्रस्त पोस्टमुळे वाद?

जुलै महिन्यात दिशाची बहिण खुशबू पटानीने इन्स्टाग्राम स्टोरीवरून कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल काही वादग्रस्त टिप्पणी केली होती. सुरुवातीला तिची टिप्पणी प्रेमानंद जी महाराजांशी जोडली गेली आणि मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर खुशबूने व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले की तिचा उद्देश अनिरुद्धाचार्यांविषयी होता.
advertisement

सोशल मीडियावर दिले धमकीचे निवेदन

या वादानंतर खुशबू पटानीवर लक्ष्य साधले गेले. तिच्या पोस्टनंतर काही दिवसांनी वीरेंद्र चरण आणि महेंद्र सरन या गुंडांनी सोशल मीडियावर धमकीचे निवेदन जारी केले. त्यानंतरच बरेलीतील दिशा पटानीच्या घरी गोळीबार झाला असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. अशीही माहिती समोर आली आहे की USAमध्ये असलेला कुख्यात गुंड रोहित गोदारा गोल्डी बरार गँगने स्वत: वॉइस मेसेज करत दिशा पटाणीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
बहिणीची Insta Post, संत प्रेमानंदचं नाव; दिशा पटानी घराची 'फायरिंग स्टोरी', CCTV VIDEO आला समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement