Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'आंबट शौकीन’ VIDEO चा तुफान राडा, 'तंबू पिरमाचा पेटला' व्हायरल

Last Updated:

Gautami Patil New Song: लाखोंच्या गर्दीतही तिचं नृत्य डोळ्यात भरतं, प्रेक्षकांनी वेडं करणारी गौतमी तिच्या हटके आणि जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाते.

 गौतमी पाटीलच्या 'आंबट शौकीन’ VIDEO
गौतमी पाटीलच्या 'आंबट शौकीन’ VIDEO
मुंबई : स्टेजवर लावणीचा तडका, ठसकेबाज डान्स म्हटलं की गौतमी पाटील आठवते. लाखोंच्या गर्दीतही तिचं नृत्य डोळ्यात भरतं, प्रेक्षकांनी वेडं करणारी गौतमी तिच्या हटके आणि जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाते. सतत चर्चेत असणारी गौतमीने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सबसे कातील गौतमी पाटीलचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचं नवं गाणं.
गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रिलीज होताच या गाण्याने धुमाकूळ घातलाय. ‘तंबू पिरमाचा पेटला’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सध्या चांगलंच चर्चेत आलंय.
गौतमी पाटीलचं नवं गाणं
‘आंबट शौकीन’ या आगामी मराठी चित्रपटात गौतमी पाटीलचं "तंबू पिरमाचा पेटला" हे ठसकेबाज नवं गाणं सध्या चर्चेत आहे. या गाण्याने सोशल मीडियावर राडाच केलाय. आणि लाखोंच्या व्ह्यूजसह युट्यूबवर ट्रेंड करत आहे.
advertisement
संगीतकार साई-पियुष यांच्या चालींनी आणि पियुष कुलकर्णी, ओंकारस्वरूप बागडे आणि अजित विसपुते यांच्या दमदार आवाजांनी गाण्याला भारदस्त साथ दिली आहे. गीतकार संदेश राऊत यांच्या शब्दांमध्ये लावणीचा पारंपरिक बाज असूनही आजच्या तरुणाईला भिडेल अशी झिंग आहे. तर नृत्यदिग्दर्शक राहुल ठोंबरे यांनी गौतमीच्या अंगभूत लावणीला साजेसे नृत्य देऊन हा सोने पे सुहागा क्षण बनवला आहे.
advertisement
दरम्यान, १३ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘आंबट शौकीन’ मध्ये मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि नवोदित चेहऱ्यांचा झगमगाट आहे. पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, अमेय वाघ यांच्यासह आणखी अनेक कलाकार. निखिल वैरागर यांची कथा आणि दिग्दर्शन, आणि अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे संवाद, हे सगळं मिळून सिनेमात विनोद, गोंधळ, आणि नृत्याची फोडणी घालणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'आंबट शौकीन’ VIDEO चा तुफान राडा, 'तंबू पिरमाचा पेटला' व्हायरल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement