Gautami Patil: पुण्यातील अपघाताला नवं वळण, गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांनी बजावली नोटीस

Last Updated:

जखमी रिक्षाचालकावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहे. पण, रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : नृत्यांगना आणि अभिनेत्री गौतमी पाटील सध्या एका प्रकरणामुळे वादात सापडली आहे. गौतमी पाटील हिच्या कारचालकाने पुण्यात एका रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह २ जण जखमी झाले. जखमी रिक्षाचालकावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहे. पण, रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे.
advertisement
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला होता. गौतमी पाटीलच्या मालकीच्या असलेल्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे जखमी झाले होते. त्यांच्यासोबत इतर २ प्रवासीही जखमी झाले होते.  या अपघातानंतर गौतमीचा कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी ३० वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे. ही कार  गौतमी पाटीलच्या नावाने असल्याने तपासासाठी पुणे पोलिसांची तिला नोटीस बजावली आहे.  अपघात प्रकरणी चौकशी करण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांनी गौतमीला नोटीस पाठवली आहे.
advertisement
गौतमीला पोलीस स्टेशनला हजर राहावं लागेल
दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. या अपघात प्रकरणी चौकशी साठी हजर रहावं, असे या नोटीस मध्ये बजावण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गौतमी पाटीलच्या टीमवर रिक्षाचालक कुटुंबीयांचा गंभीर आरोप
दरम्यान, अपघात झाल्यानंतर आम्ही पोलिसांच्या तपासावर अजिबात समाधानी नाही. घटनास्थळी पंचनामा न करत गौतमी पाटील हिची गाडी हलवण्यात आली होती. ही गाडी कुणी हलवली? ती हलवली कुणी, टोईंग करून कोण घेऊन गेलं? साक्षीदारांचे जबाब कुणी बदले आहे. आम्हाला आरोपींची ओळख दाखवली नाही. सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिले नाही. एवढंच नाहीतर आम्ही गौतमी पाटील यांचं सीडीआर रिपोर्ट मागितले पण पोलिसांनी ते दिले नाही. गौतमी पाटील यांची कार भोरमधून निघाली होती ते अपघात जिथे झाला, त्याचे सीडीआर रिपोर्ट मागितले आहे. तसंच या अपघातात गौतमी पाटील यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. या प्रकरणाबद्दल आम्ही माहिती मागितली पण पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप मरगळे कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement
पोलीस स्टेशनला दुसराच ड्रायव्हर हजर
आमचा पेशेंट हा व्हेटिलेटरवर आहे. पण ४ दिवस झाले आहे. पोलिसांनी आम्हाला कोणतीही नीट माहिती दिली नाही. पोलिसांनी आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेज दिलं आहे, ज्यामुळे कार खूप लांब दिसत आहे, यामध्ये कारचा नंबर सुद्धा दिसत नाही. आम्हाला संशय आहे की, पोलिसांनी ज्या ड्रायव्हरला अटक केली आहे, तो मुळ ड्रायव्हरच नाही. पोलीस स्टेशनला दुसराच ड्रायव्हर हजर करण्यात आला. एवढंच नाहीतर फिर्यादीही बदलण्यात आले आहे. सकाळी आम्हाला जेव्हा कळलं, तेव्हा इतर रिक्षाचालकांना विचारलं, पण कुणालाच कारचा नंबर पाहता आला नाही, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. मुळात रिक्षाचालकांसाठी ही गोष्ट खूप साधी असते. पण कारची नंबरप्लेट आमच्या रिक्षाला धडक दिल्यानंतर अडकली होती, त्यामुळे हे सगळं प्रकरण समोर आलं.
advertisement
गौतमी पाटील अपघाताच्या वेळी कारमध्येच होती? 
त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. जेव्हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील या कारमध्ये होत्या, त्यांना समोर आणलं पाहिजे. गाडी मालक या गौतमी पाटील आहे तर त्या समोर का येत नाही. पोलिसांना विचारलं तर पोलीस सांगतात की, गौतमीला नोटीस दिली आहे. पण प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का? आम्ही सामन्य घरातले आहोत म्हणून तपास करायचा नाही का? तसं असेल तर पोलिसांनी सांगावं. मुळात अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील यांच्याा टीमकडून साधी विचारपूसही झाली नाही. गौतमी पाटील यांचं कार्यक्रम आजही सुरूच आहे. पण त्यांनी पुढं येऊन साधी विचारपूसही केली नाही. यामुळे त्या कुठे घाबरल्या आहेत का? या प्रकरणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे जाणार आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही रिक्षाचालक मगराळे यांच्या मुलीने केली आहे.
advertisement
नेमका अपघात कसा झाला?
३० सप्टेंबरच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास गौतमी पाटील हिच्या कारला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या कारचा पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला. हा अपघात एका हॉटेल समोर झाला. या हॉटेलसमोर रिक्षाचालक उभा होता. रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या गौतमी पाटील हिच्या गाडीने रिक्षाला जोराची पाठीमागून धडक दिली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर तातडीने लोक धावून आले. त्यांनी जखमी रिक्षाचालक आणि प्रवाशांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. य प्रकरणी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या रिक्षाचालकाला अटक केली आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil: पुण्यातील अपघाताला नवं वळण, गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांनी बजावली नोटीस
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement