Kajol : "मी माझ्या चित्रपटांची मालकीण, हीट असो वा फ्लॉप"; आपल्या सिनेमांबद्दल काजोलचं वक्तव्य

  • Published by:
Last Updated:

Kajol : अभिनेत्री काजोलच्या 'द ट्रायल' या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान अभिनेत्रीने हिट आणि फ्लॉप चित्रपटांबद्दल वक्तव्य केलं आहे.

News18
News18
Kajol : बॉलिवूड अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी आपल्या चित्रपटामुळे तर कधी आपल्या वक्त्याने अभिनेत्री सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री आपल्या लक्षवेधी वक्तव्याने चर्चेत आली आहे. काजोलच्या 'द ट्रायल' या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच अभिनेत्रीने आपल्या हिट आणि फ्लॉप चित्रपटासंदर्भात वक्तव्य केलं आहे. आपल्या सिनेप्रवासात कोणतीही गोष्ट बदलण्यास काजोल तयार नाही. "मी माझ्या प्रत्येक चित्रपटाची मालकीण आहे. मग ती कलाकृती हिट होऊदेत अथवा फ्लॉप".
बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं म्हणनं आहे की, ती आपल्या प्रत्येक कलाकृतीत 100% देत असते.'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' आणि 'कभी खुशी कभी गम' सारखे चित्रपट किंवा 'गुंडाराज' आणि 'हलचल' सारखे फ्लॉप चित्रपट असो. प्रत्येक चित्रपटात काजोलने जीव ओतुन काम केलं आहे. काजोल लवकरच 'द ट्रायल' या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागात झळकणार आहे.
advertisement
मी माझ्या चित्रपटांची मालकीण : काजोल
अभिनेत्री काजोलने 1992 मध्ये 'बेखुदी' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. आता पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली,"माझ्या करिअरमध्ये काहीही बदलण्याची मला गरज वाटत नाही. माझ्या प्रत्येक चित्रपटाने मला काहीतरी शिकवलं आहे. प्रत्येक चित्रपटात मी 100% दिले आहेत. कॅमेरासमोर मी कधीही कोणतेही वाईट कृत्य केले नाही याचा मला सार्थ अभिमान आहे".
advertisement
काजोलने 1995 मध्ये 'करण अर्जुन' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केलं. त्याचदरम्यान अभिनेत्रीने 'ताकत','हलचल' आणि 'गुंडाराज'सारखे चित्रपटही केले. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे चित्रपट कमी पडले. पण या प्रत्येक चित्रपटाकडून मी अनेक गोष्टी शिकले आहे.
अभिनेत्री काजोल गेल्या 30 वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांनी काजोलला लहानाची मोठी होत असताना पाहिलं आहे. अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाच्या स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kajol : "मी माझ्या चित्रपटांची मालकीण, हीट असो वा फ्लॉप"; आपल्या सिनेमांबद्दल काजोलचं वक्तव्य
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement