'कांतारा' सुपरस्टार ऋषभ शेट्टीला 'दशावतार'ची भुरळ, भरभरुन कौतुक करत म्हणाला 'भविष्यातील पिढ्यांसाठी...'

Last Updated:

एका खास मुलाखतीत ऋषभ शेट्टीने अशाच आशयाच्या आणखी एका चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. हा चित्रपट म्हणजे मराठीत सुपरहिट ठरलेला, दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला 'दशावतार'!

News18
News18
मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा: चॅप्टर १' च्या यशाचा आनंद घेत आहे आहे. मूळ भारतीय संस्कृती, परंपरा, श्रद्धा आणि जंगलाशी जोडलेल्या कथांबद्दल त्याने नेहमीच आदर व्यक्त केला आहे. अनेक अर्थांनी ऋषभ शेट्टी असा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणणारा एक दुवा बनला आहे, जो मानवी जीवन, संस्कृती आणि त्यांच्या मुळांना जोडण्याचे काम करतो.

दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'वर ऋषभ शेट्टी बोलला!

ईटाईम्सला दिलेल्या एका खास मुलाखतीत ऋषभ शेट्टीने अशाच आशयाच्या आणखी एका चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. हा चित्रपट म्हणजे मराठीत सुपरहिट ठरलेला दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला 'दशावतार'! बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांना तगडी टक्कर देत या मराठी चित्रपटनेही बॉक्स ऑफिसवर प्रभावी कामगिरी केली आहे.
advertisement
'दशावतार' चित्रपट पाहण्याची संधी मिळाली का, असे विचारल्यावर ऋषभ शेट्टी म्हणाला, "मी त्याबद्दल ऐकले आहे आणि खूप चांगला अभिप्रायही मिळाला आहे, पण आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे मला तो पाहता आला नाही. पण आमचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी तो नक्कीच पाहणार आहे."
advertisement

चित्रपटाच्या संहितेचं केलं कौतुक

या प्रकारच्या कथांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करताना ऋषभ शेट्टी म्हणाला, "मुळं, संस्कृती आणि जंगलाच्या कथांवर चित्रपट बनवले जात आहेत, हे खूपच छान आहे. हे विषय लोकांना कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत; ते मनोरंजक असतात, विचार करायला लावणारे असतात आणि महत्त्वाचे म्हणजे, ते भविष्यातील पिढ्यांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून काम करतात."
advertisement
सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेला 'दशावतार' हा कोकणातील संस्कृती आणि सामाजिक समस्यांवर आधारित नाट्य-थरारपट आहे, ज्याने आतापर्यंत २३.०२ कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसरीकडे, ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' भारतात २५६.५० कोटी रुपयांची कमाई करत आपला यशस्वी प्रवास कायम ठेवत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कांतारा' सुपरस्टार ऋषभ शेट्टीला 'दशावतार'ची भुरळ, भरभरुन कौतुक करत म्हणाला 'भविष्यातील पिढ्यांसाठी...'
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement