KGF 2 च्या डायरेक्टरवर दु:खाचा डोंगर, पोटचा मुलगा गमावला, साडेचार वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
KGF 2 च्या डायरेक्टरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण साऊथ इंडस्ट्री हळहळ व्यक्त करत आहे. मुलासोबत नेमकं काय घडलं?
घरात लहान मुलं म्हटलं की त्याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. नाहीतर काहीही अघटित होण्याची शक्यता असते. प्रसिद्ध डायरेक्टरबरोबर असचं घडलं. आपल्या साडेचार वर्षीय मुलाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि लिफ्टमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला. KGF 2 च्या डायरेक्टरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण साऊथ इंडस्ट्री हळहळ व्यक्त करत आहे. मुलासोबत नेमकं काय घडलं?
KGF 2 या सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणारा कीर्तन नागगौडा याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कीर्तन नादगौडाला साडेचार वर्षांचा गोंडस मुलगा होता. सोनार्श असं त्याचं नाव होतं. सोनार्शचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. या घटनेनं मनोरंजनविश्व हादरून गेलं आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
सोमवारी म्हणजे 15 डिसेंबर रोजी कीर्तनचा मुलगा सोनार्श खेळता खेळता एका लिफ्टमध्ये गेला. तो लिफ्टमध्ये अडकला. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. साडेचार वर्षांच्या चिमुकल्या सोनार्शला गंभीर दुखापत झाली. त्याचा अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात जाईपर्यंत खूप उशिर जाला होता. अपघात इतका भीषण झाला होती रुग्णलयात नेताच डॉक्टरांनी सोनार्शला मृत घोषित केलं. साडेचार वर्षांचा पोटचा गोळा गमावल्यानंं नादगौडा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
कीर्तन नादगौडाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्याने KGF 2 मध्ये दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत को डायरेक्टर म्हणून काम केलं. दोघेही सध्या 'मैत्री मुव्ही मेकर्स' या आगामी मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होते. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच कीर्तनच्या आयुष्यात मोठी घडामोड घडली आहे. त्याच्या मुलाचा मृत्यूनं तो पूर्णपणे हादरला आहे.
या घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्ट करत लिहिलंय, "दिग्दर्शक कीर्तन नादगौडा यांच्या मुलाच्या अकाली निधनाची बातमी ऐकून प्रचंड धक्का बसला. कीर्तन आणि समृद्धी पटेल यांच्या कुटुंबावर ओढवलेला हा प्रसंग अत्यंत क्लेशदायक आहे. या कठीण काळातून सावरण्यासाठी देवाने त्यांना शक्ती द्यावी, हीच प्रार्थना."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 1:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
KGF 2 च्या डायरेक्टरवर दु:खाचा डोंगर, पोटचा मुलगा गमावला, साडेचार वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू











