Madhuri Dixit: 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत माधुरी दीक्षितचा रोमान्स, अभिनेत्रीची झालेली अशी अवस्था!

Last Updated:

Madhuri Dixit: बॉलिवूडची 'धक धक' गर्ल माधुरी दीक्षित ही केवळ सौंदर्यामुळेच नव्हे, तर अभिनयाच्या जोरावरही अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत माधुरी दीक्षितचा रोमान्स
18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत माधुरी दीक्षितचा रोमान्स
मुंबई : बॉलिवूडची 'धक धक' गर्ल माधुरी दीक्षित ही केवळ सौंदर्यामुळेच नव्हे, तर अभिनयाच्या जोरावरही अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अनिल कपूर, सलमान खान, शाहरुख खान यांच्यासारख्या सुपरस्टार्ससोबत तिने अनेकोंदा स्क्रीन शेअर केली आहे. पण एका अभिनेत्याने मात्र तिला सेटवर गोंधळून टाकलं होतं. अक्षरशः तिला घाम फुटला होता. माधुरीसोबत नेमकं काय घडलेलं.

18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत माधुरीचा रोमान्स

माधुरी दीक्षितने 18 वर्षांनी मोठ्या नसीरुद्दीन शाहसोबत रोमान्स सीन शूट केला होता. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेढ इश्किया’ या चित्रपटात नसीरुद्दीन आणि माधुरी यांच्यात काही रोमँटिक सीन होते, आणि त्याबाबत माधुरीने स्वतः एक आठवण शेअर केली.
advertisement
ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान माधुरीने सांगितलेलं की, नसीरुद्दीन शाहसोबत काम करताना ती अक्षरशः लाजून जायची. त्याच्या डोळ्यांत अशी काही जादू होती की, त्याच्याकडे बघताना तिला घाम फुटायचा! तो अभिनय करत नव्हता, तर त्या भावनांना खरंच जगत होता. तिच्या मते, नसीरुद्दीनसोबत रोमान्स करणं सोपं नव्हतं कारण तो अभिनयाच्या फार उच्च पातळीवरचा कलाकार आहे. पण त्याचवेळी तो सेटवर फार हसतमुख आणि मजेशीर होता. इंडस्ट्रीत त्याच्याबद्दल “तो चिडका आहे” असं म्हटलं जायचं, पण माधुरीचा अनुभव मात्र पूर्णपणे उलटा होता.
advertisement
‘इश्किया’ या हिट सिनेमाचा‘डेढ इश्किया’ हा दुसरा भाग होता. अभिषेक चौबे दिग्दर्शित आणि विशाल भारद्वाज निर्मित, या चित्रपटात अर्शद वारसी, हुमा कुरेशी आणि विजय राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. बजेट जवळपास 35 कोटींचं असतानाही, हा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ 27.24 कोटी रुपयेच कमावू शकला. मात्र, नसीरुद्दीन आणि माधुरीच्या जोडीची चर्चा मात्र कायम राहिली.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhuri Dixit: 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत माधुरी दीक्षितचा रोमान्स, अभिनेत्रीची झालेली अशी अवस्था!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement