Madhuri Dixit Song : शाहरूख-माधुरीचा 22 वर्षांआधी आलेला सिनेमा, त्यातील ते गाणं ऐकून आजही ढसाढसा रडतात लोक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit Song : माधुरीने आतापर्यंत काम केलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावलं. पण माधुरीचं एक असं गाणं जे ऐकल्यानंतर लोक ढसाढसा रडतात.
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडला अनेक दर्जेदार सिनेमे दिले. बॉलिवूडच्या नव्या आणि जुन्या सगळ्या अभिनेत्यांबरोबर तिनं काम केलं आहे. शाहरुख खान आणि माधुरीची जोडीही हिट झाली. दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. माधुरीने आतापर्यंत काम केलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावलं. पण माधुरीचं एक असं गाणं जे ऐकल्यानंतर लोक ढसाढसा रडतात. माधुरी आणि शाहरुख खान यांच्यावर हे गाणं शूट करण्यात आळं आहे.
माधुरी आणि शाहरुख यांनी एकत्र काम केलेल्या एका सिनेमापैकी एक सिनेमा म्हणजे 'हम तुम्हारे हैं सनम' हा सिनेमा. या सिनेमाची कथा दमदार होतीच पण सिनेमातील गाणीही प्रेक्षकांना तितकीच भावली. सिनेमातील प्रत्येक गाणं आजही लोक आवडीनं पाहतात.
advertisement
या सिनेमात शाहरुख खानने माधुरीच्या पती गोपाळची भूमिका साकारली होती. तर सलमान खान तिचा जिवलग मित्र सूरजच्या भुमिकेत आहे. या रोमँटिक ड्रामामध्ये ऐश्वर्या रायही एका छोट्या भूमिकेत झळकली होती.
'हम तुम्हारे हैं सनम' या सिनेमातील 'सब कुछ भुला दिया' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि गायिका सपना अवस्थी यांनी आवाज दिला आहे.
advertisement
T-Series Bollywood Classics या यूट्यूब चॅनलवर या गाण्याला सात वर्षात 347 मिलियन व्ह्यूज, 1.5 मिलियन लाईक्स आणि 54,000 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. जरी हे गाणं 22 वर्षं जुन्या चित्रपटातील असलं तरी आजच्या तरुणाईलाही ते तितकंच आवडतं.
advertisement
‘सब कुछ भुला दिया’ हे गाणं ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी येतं. गाण्याची संगीत रचना, माधुरी-शाहरुखची केमिस्ट्री आणि सोनू निगमचा भावनिक आवाज या सगळ्यांनी मिळून हे गाणं आजही अमर केलं आहे.
शाहरूख-माधुरीचे फेमस सिनेमे
शाहरुख खान आणि माधुरी यांनी हम तुम्हारे हैं सनम या सिनेमाबरोबरच 'अंजाम', 'खोया', 'दिल तो पागल हैं', 'देवदास', 'गजगामिनी' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhuri Dixit Song : शाहरूख-माधुरीचा 22 वर्षांआधी आलेला सिनेमा, त्यातील ते गाणं ऐकून आजही ढसाढसा रडतात लोक


