Prithvik Pratap : जिंकलस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापला भेटल्या 93 वर्षीय आजी; तोंडभरून केलं कौतुक

  • Published by:
Last Updated:

Prithvik Pratap Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापला घराजवळ एक 93 वर्षीय आजी भेटल्या असून विनोदवीराचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे.

News18
News18
Prithvik Pratap : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची महाराष्ट्रासह जगभरात चांगलीच क्रेझ आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या कार्यक्रमाने, या कार्यक्रमाचा भाग असलेल्या प्रत्येकाने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. लहान मुलांसह वयोवृद्ध मंडळींपर्यंत सर्वांनाच सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने वेड लावलं आहे. नुकतीच एक वृद्ध चाहती तिच्या आवडत्या कलाकाराला अर्थात विनोदवीर पृथ्वीक प्रतापला भेटली. पृथ्वीक आणि आजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महाविद्यालयात असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा पृथ्विक मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा सर्वच क्षेत्रात दमदार काम करत आहे. सोशल मीडियावरदेखील तो तेवढाच सक्रीय आहे. यशाच्या शिखरावर असलेल्या पृथ्विकचा स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग आहे. पृथ्वीकलादेखील चाहत्यांसोबत गप्पा मारायला आवडतं. आपल्या या साधेपणाने तो सर्वांचीच मनं जिंकत असतो.
advertisement
आजींच्या भेटीबद्दल न्यूज 18 मराठीसोबत बोलताना पृथ्वीक म्हणतो,"मी घराजवळ गाडीचं काम करत असताना एक 93 वर्षीय आजी आपल्या 55-60 वर्षीय मुलासह बागेत फेरफटका मारायला जात असताना मला भेटायला. आजींनी लांबूनच मला ओळखलं होतं. मला भेटून आजींना खूप आनंद झाला होता. त्यांना ऐकू कमी येतं. पण तरी लिप मुव्हमेंटच्या माध्यमातून त्या हास्यजत्रेचा प्रत्येक एपिसोड आनंदाने पाहतात. दिवसभर त्यांच्या घरी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सुरू असतो. आजी लिप मुव्हमेंटनेच पंचेचपण ओळखतात. हास्यजत्रेसारख्या कार्यक्रमामुळे आमचं आयुष्य वाढतं, अशी भावना आजींनी यावेळी व्यक्त केली".
advertisement
पृथ्वीकच्या व्हिडीओने जिंकली सर्वांची मने
पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या आजींच्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे,"आज महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहून मनापासून दाद देणाऱ्या मनाने आणि आवाजाने सर्वात तरुण प्रेक्षक भेटल्या. प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप सर यांचं तोंडभरून कौतुक करताना जराही न थकणाऱ्या आजींचा आवाज हा अगदी खणखणीत आणि आजच्या तरुण पिढीलाही लाजवणारा होता".
advertisement
advertisement
पृथ्विकच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'जिंकलस भावा, कोणत्याही पुरस्कारापेक्षा हा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा, अभिमान वाटतो, आणखी काय हवं, हेच कमवायचं असतं, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prithvik Pratap : जिंकलस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापला भेटल्या 93 वर्षीय आजी; तोंडभरून केलं कौतुक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement