Jay Bhanushali-Mahi Vij : घटस्फोटानंतर घेतली 5 कोटींची पोटगी? स्पष्टच बोलली माही वीज, जय भानुशालीबद्दल सांगितली 'ती' गोष्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jay Bhanushali-Mahi Vij Divorce: अखेर माही वीजने जय भानुशालीसोबतच्या नात्याबद्दल आणि ५ कोटी पोटगीवर आपल्या यूट्युब चॅनलवरून एक शांत व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी माही विज आणि जय भानुशाली यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. घटस्फोटापासून ते माहीने जयकडे ५ कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या. या सर्व गोंधळावर आता माही वीजने अखेर आपल्या यूट्युब चॅनलवरून एक शांत व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.
माही विजने तिच्या वैवाहिक स्थितीबद्दल कोणतीही स्पष्ट कबुली किंवा नकार दिला नाही, पण तिने एक गोष्ट ठामपणे मांडली, ती म्हणजे खोट्या बातम्या पसरवणे थांबवावे. माही म्हणाली, "जोपर्यंत मी स्वतः काही सांगत नाही, तोपर्यंत कृपया कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका. आमच्या खासगी आयुष्याचा आणि आमच्या मुलांच्या खासगी आयुष्याचा आदर करा."
5 कोटींच्या पोटगीवर स्पष्टच बोलली माही
advertisement
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माहीने ५ कोटी रुपयांच्या पोटगीच्या बातमीला थेट आव्हान दिले. ती म्हणाली, "जे लोक मी कागदपत्रांवर सह्या केल्याचे सांगत आहेत, त्यांनी मला पुरावा दाखवावा. असा दावा करण्यापूर्वी मला ती कागदपत्रे दाखवा."
या सततच्या खोट्या कहाण्यांचा कुटुंबावर, विशेषतः मुलांवर कसा परिणाम होतो, हे सांगताना माही भावूक झाली. ती म्हणाली, "आजकाल प्रत्येक मुलाकडे फोन असतो. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे त्यांच्यावर परिणाम होतो. माझ्या मुलाने तर मला एक रिपोर्ट पाठवला आणि विचारले, 'ममा, काय चाललंय हे?'"
advertisement
जयबद्दल सांगितली ती खास गोष्ट
यामुळेच अशा सनसनाटी बातम्या देणाऱ्यांना तिने मुलांच्या भवितव्याचा विचार करण्याचा सल्ला दिला. जरी माहीने त्यांच्या नात्याबद्दल स्पष्ट भाष्य केले नसले तरी, जय भानुशालीबद्दल बोलताना तिच्या शब्दांत प्रेम आणि आदर स्पष्ट दिसत होता. माही म्हणाली, "जय माझा परिवार आहे आणि तो नेहमीच माझा परिवार राहील. तो एक अद्भुत वडील आहे आणि एक अद्भुत माणूस आहे."
advertisement
२०११ मध्ये लग्न केलेल्या माही आणि जयला तारा नावाची मुलगी आहे, तसेच ते खुशी आणि राजवीर या दोन मुलांनाही वाढवत आहेत. माही 'लागी तुझसे लगन' आणि 'बालिका वधू' यांसारख्या मालिकांसाठी ओळखली जाते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 9:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Jay Bhanushali-Mahi Vij : घटस्फोटानंतर घेतली 5 कोटींची पोटगी? स्पष्टच बोलली माही वीज, जय भानुशालीबद्दल सांगितली 'ती' गोष्ट


