बिग बॉस फेम मराठी अभिनेत्याच्या बायकोची राजकारणात एन्ट्री, BMC निवडणूकीच्या रिंगणात
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Actor Wife in Politics : एकीकडे अभिनयाची ग्लॅमरस दुनिया तर दुसरीकडे अभिनेत्याची पत्नी आता राजकारणात नशीब आजमावणार आहे. कोण आहे ती?
मुंबई : सध्या सर्वत्र BMC निवडणूकांचे वारे वाहत आहेत. अशातच राजकारणाच्या रिंगणातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी राजकारणात एन्ट्री घेतेय. येणारी महापालिकेची निवडणूक ती लढवणार आहे. अभिनेत्याने बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली होती. त्याचबरोबर तो अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करतो. एकीकडे अभिनयाची ग्लॅमरस दुनिया तर दुसरीकडे अभिनेत्याची पत्नी आता राजकारणात नशीब आजमवताना दिसणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजेच अक्षय वाघमारे. मराठी मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अक्षय वाघमारेची बायको आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळीनं राजकारणात एन्ट्री घेतली आहे. योगिता यंदाच्या MBC निवडणूका लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
गीता गवळींच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार
अरुण गवळी काही दिवसांआधीच तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून सुटल्यानंतर आता ते सक्रीय राजकारणात उतरणार अशी चर्चा होती. मात्र आता त्यांच्याजागी त्यांची दुसरी मुलगी योगिता गवळी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेना मुंबईच्या माजी नगरसेविका आणि डॅडींची मोठी मुलगी गीता गवळींच्या नेतृत्वात योगिता गवळी पालिका निवडणूक लढणार आहे.
advertisement
मुंबई पालिकेत अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेचे दोन नगरसेवक होते. यातील माजी नगरसेविका वंदना गवळी या शिंदेच्या शिवसेनेत गेल्या आहेत. वंदना गवळी यांच्या विरोधात अखिल भारतीय सेनेचा एक उमेदवार देणार असल्याची माहिती गीता गवळी यांनी दिली आहे. राजकारणात उतरणारी योगिता ही महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेत काम करते.
advertisement
2020मध्ये अभिनेता अक्षय वाघमारेसोबत लग्न
अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये साध्या पद्धतीनं लग्न केलं होतं. त्याच्या एक वर्ष आधी दोघांचा साखरपुडा झाला होता. 8 मे 2020 रोजी दोघांचं लग्न झालं. लेकीच्या लग्नासाठी अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आले होते. लग्नाच्या काही वर्षातच योगिता आणि अक्षय यांना कन्यारत्न प्राप्त झालं.
advertisement
advertisement
अक्षय वाघमारे वर्कफ्रंट
अक्षय वाघमारेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसला होता. पण पहिल्याच आठवड्यात तो आऊट झाला. त्याचबरोबर त्याने 'फत्तेशिकस्त', 'बस स्टॉप', 'दोस्तीगिरी', 'बेधडक' सारख्या सिनेमांत काम केलं आहे. मध्यंतरी तो 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतही दिसला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉस फेम मराठी अभिनेत्याच्या बायकोची राजकारणात एन्ट्री, BMC निवडणूकीच्या रिंगणात