Sandya Shantaram : शांताराम बापूंची 2 लग्न मोडल्यानंतर आयुष्यात आली होती संध्या, दिली शेवटपर्यंत साथ, फिल्मी आहे Love Story

Last Updated:

Sandya Shantaram : संध्या शांताराम या व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.

News18
News18
Sandya Shantaram V. Shantaram : ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाने मराठी-हिंदी इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संध्या शांताराम या हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. व्ही. शांताराम हे दिसायला देखणे होते. त्यामुळे शूटिंगदरम्यान अनेक स्त्रीया त्यांच्या प्रेमात पडत असे. वैयक्तिक आयुष्यात व्ही. शांताराम यांनी तीन लग्न केली. चित्रपटांप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील चांगली चर्चा रंगली. व्ही. शांताराम यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमलाबाई, दुसऱ्या पत्नीचे नाव जयश्री आणि तिसऱ्या पत्नीचे नाव संध्या. संध्या शांताराम या अभिनेत्री असण्यासोबत डान्सर होत्या. व्ही. शांताराम यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या आतच संध्यासोबत लग्न केलं होतं.
व्ही. शांताराम यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1921 मध्ये 12 वर्षांच्या विमलाबाईसोबत संसार थाटला. पण पुढे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देखणे, रुबाबदार व्ही. शांताराम जयश्री कामलकर यांच्या प्रेमात पडले. शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि 1941 मध्ये त्यांनी लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्यांनी दुसरा संसार थाटला होता. व्ही. शांताराम या विवाहित पुरुषासोबत लग्न केल्याने जयश्री यांना अनेकांनी हिणवलं. त्यामुळे त्या मानसिकरित्या खचल्या.
advertisement
लग्नाच्या 15 वर्षांत जयश्री आणि व्ही. शांताराम यांच्यात खटके उडू लागले. दरम्यान त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री संध्याची एन्ट्री झाली. व्ही. शांताराम आणि संध्या यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे व्ही. शांताराम आणि संध्या यांच्या जवळीकचं संध्या यांना कळलं आणि त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटाच्या एका महिन्यातच व्ही. शांताराम यांनी संध्या देशमुख यांच्यासोबत तिसरं लग्न केलं.
advertisement
'नवरंग' चित्रपटातील 'अरे जा रे हट नटखट' गाण्यातील स्त्री पुरुष अशी दुहेरी व्यक्तिरेखा साकारून संध्या यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. 'पिंजरा' हा त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरला. संध्या यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. यातूनच त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. संध्या यांनी मराठीसह हिंदी चित्रपटातही अभिनयाचा ठसा उमटवला. विमल, जयश्री या दोन पत्नी असतानाही व्ही. शांताराम यांनी संध्या यांच्यासोबत तिसरे लग्न केले. विशेष म्हणजे शांताराम यांच्या मुलांना त्यांनी आपलेसे केले. हीच आपली मुलं असे समजून त्यांनी स्वतःचे मूल होऊ दिले नाही.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sandya Shantaram : शांताराम बापूंची 2 लग्न मोडल्यानंतर आयुष्यात आली होती संध्या, दिली शेवटपर्यंत साथ, फिल्मी आहे Love Story
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement